आकाशवाणीवर आज सुनील वारे यांची मुलाखत

09 Dec 2025 21:59:39
 
 

vare 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व याेगदान या विषयावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत मंगळवारी (9 डिसेंबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका डाॅ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 
डाॅ. आंबेडकरांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडवण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने कार्यरत आहे.समाजातील वंचित घटकांना अंधश्रद्धा, जातीय-पंथीय भेदभाव, सांप्रदायिक द्वेष व असमानतेतून मु्नत करत वैज्ञानिक दृष्टिकाेन, सामाजिक ऐक्य आणि समतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी शासनामार्फत विविध धाेरणात्मक उपक्रम राबवले जातात.याच पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. आंबेडकरांचे बहुआयामी कार्य, विचारसंपदा आणि राष्ट्रनिर्मितीतील याेगदान या विषयावर वारे यांनी या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
Powered By Sangraha 9.0