आपण सर्वजण ‘गेस्ट’ बनून जन्मास आलाे आहाेत म्हणून आपल्याला गेस्ट बनूनच राहायला हवे. आपल्याला जर का गेस्ट बनून राहायला यायला लागले की, मग हे जग आपल्यासाठी चांगलेच आहे. मात्र, दुर्दैवाने आपण पाहुण्यांची याेग्यता, रीती-रिवाज सर्वकाही विसरलाे आहाेत. आपण स्वत:ला पाहुण्याऐवजी मालक म्हणून समजू लागलाे आहाेत. पाहुण्याने पाहुण्यासारखे राहावे.पाहुण्याने स्वयंपाकघरात जाणे आणि आपण निसर्ग नियमाविरुद्ध वागणे याेग्य नाही.