एखाद्या वेळी शरीराला भाेजन नाही मिळालं तरी मी ते सहन करू शकताे. पण चित्ताला भाेजन नाही मिळालं तर? प्रेम हे चित्ताचं भाेजन आहे. चित्ताला प्रेमामुळे प्राण मिळताे. तर मग जाेवर प्रेमाची जरूर आहे ताेवर मित्र-शत्रूंना एक कसं समजावं? तिथे समत्व कसे साधेल? तुम्ही तटस्थ कसे व्हाल? जाे प्रेम देताे ताे मित्र, जाे प्रेम देत नाही ताे शत्रू, तेव्हा जाेवर काेणीतरी प्रेम द्यावं ही तुमची आकांक्षा शिल्लक आहे ताेवर...अन् ही गंमतीची गाेष्ट आहे की जगातली प्रत्येक व्य्नती म्हणते की, ‘मला काेणीतरी प्रेम द्यावं!’ मी कुणाला तरी प्रेम द्यावं असं क्वचित तरी कुणाला वाटत असेल. हे थाेडं बारकाव्यानं समजून घ्यायला पाहिजे.
आपण प्रेम देत आहाेत हा भ्रम आपणा सगळ्यांनाच झालेला असताे. पण आपण मुळी प्रेम देता ते यासाठी देता की, परतून आपल्याला प्रेम मिळावं म्हणजे आपण फ्नत गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट करता-प्रेम देत नाही.आपण फ्नत व्यवसायात गुंतून जाता.मला प्रेम परत मिळावं या हेतूने जर मी प्रेम देत असेन किंवा प्रेम दिल्याशिवाय प्रेम मिळणार नाही असं जर असेल, तर मग मी फ्नत साैदा करीत आहे. माझा प्रयत्न तर प्रेम मिळवणं हाच आहे. देताेयच यासाठी की दिल्याशिवाय मिळणार नाही. हे माझं दिलेलं प्रेम माश्यांसाठी लावलेल्या गळासारखंच आहे. फ्नत कामटीला गळ लटकावायचा आणि बसायचं. मासळीला वाटत असतं, चला बरं झालं! आयतंच काेणीतरी आपल्याला जेवण वाढून ठेवलंय, तर मग बरंच झालं; पण वरपांगी फ्नत गळ दिसत असला, तरी आत काटाच आहे.