जपानमधील आओमाेरी: बर्फाचे आकर्षक शहर

05 Dec 2025 23:51:37
 

Japan 
 
जपानमधील हाेंशु आयलॅन्डवरील आओमाेरी सिटी अनेक गाेष्टींसाठी विशेष ठरली आहे. जपानच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार या शहरात गेल्या 62 वर्षांपासून सरासरी 312 इंच बर्फ पडताे, यामुळे हे शहर जगातील सर्वांत माेठे बर्फाचे स्थान म्हणून ओळखले जाते. या शहरात 2.8 लाख लाेकवस्ती आहे. 62 वर्षांपासून पडत असलेल्या बर्फामुळे रस्त्याच्या आजूबाजूला बर्फाच्या भिंती तयार हाेत असतात.आओमाेरी येथे पडत असलेला बर्फ भाैगाेलिक स्थिती आणि हवामान यांचे एक अनाेखे मिश्रण आहे. सैबेरियन वाऱ्यांमुळे जपानच्या समुद्रावर असणारे आर्द्रतेचे प्रमाण बदलते. हेन्शुच्या थंड भू-भागात ते वारे अडवले जात असल्याने येथे आर्द्रता बर्फ बनून बरसते. 2024 मध्ये हिवाळ्यात अनेक भागांमध्येदहा फूट इतका बर्फ पसरलेला हाेता. ताे भाग स्वच्छ करण्यासाठी सुमारे 3.5 काेटी डाॅलर म्हणजे 3,14,78,12,500 रुपये खर्च करावे लागले हाेते.
 
हाॅट पेवमेंट, अंडरग्राऊंड शाॅपिंग स्ट्रीट आणि अनिवार्य असलेल्या स्नाे टायर्समुळे शहराचे चलनवलन सुरू राहते.यामुळेच येथे पर्यटकांची संख्या माेठ्या प्रमाणावर दिसून येते. येथे हक्काेडा पर्वतावरील बर्फाने अच्छादित असलेले वृक्ष पाहणे हे माेठे आकर्षण आहे. सुकायु ओनसेन सारखी गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे गरम पाण्याच्या ‘बाथ’चा आनंद देतात.आओमाेरी येथील सफरजन बगिचा, स्नाेशूईंग ट्रेईल्स आणि हिवाळ्यात दिसणारे लाईट डिस्प्ले याचेही येथे आकर्षण आहे. बर्फाळलेल्या या प्रदेशाचे अनाेखे रूप प्रवाशांना दिसावे यासाठी जपान सरकारन येथील रस्ते आणि रेल्वे मार्ग त्याप्रमाणेच याेग्य बनवले आहेत.थंडीतील हे आओमाेरीचे रूप पाहण्यासाठी एकदा तरी येथे जायलाच पाहिजे.
Powered By Sangraha 9.0