अखेर मुले टाळाटाळ का करतात हे पाहायला हवे. त्यांना या सवयीपासून कसे वाचवता येऊ शकेल ते पाहू या.काही मुलांना तर ही सवय आपल्या आई- वडिलांकडूनच मिळते. ते घरात पाहतात की आई-वडील काेणतेही काम करायला कचरतात.साेबतच आपले काम इतरांवर साेपवण्याचा प्रयत्न करतात. मुलांची प्रवृत्ती अनुकरणाची असते. ती आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करून ते गुण आपल्यात उतरवतात. ज्यात टाळाटाळ करीत आई-वडिलांचा टाळाटाळीचा गुण मुलांमध्येही उतरताे.आई-वडिलांचे हे कर्तव्य आहे की ते मुलांसमाेर स्वत:ला आदर्श रुपात ठेवावे.मुलांच्या चारित्र्याचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रथम स्वत:ला सुधारायला हवे. आपले अवगुण टाळायला हवेत.काही आई-वडील लाडापाेटी मुलांची सारी कामे स्वत: करतात. त्यांना काेणतेही काम करू देत नाही. एखादे सांगितलेले काम मूल करीत नसेल तर आता ताे लहान आहे, माेठा हाेईल तेव्हा सारे करील असे मानून ते स्वत: करतात.
यामुळे मुलांमध्ये काेणतेही काम आपले नाही असा समज निर्माण हाेताे व ती कामे टाळू लागतात.आई-वडील जर मुलाला एखादे काम करायला सांगत असतील तर ताे ते काम वेळेत व व्यवस्थित करताे की नाही हे पाहावे. तसेच त्याने काम केल्यानंतर त्याची प्रशंसा करावी.कित्येकदा मुलांना त्यांना न आवडणारे काम करायला सांगितले जाते. अशा स्थितीत मुले काम करू इच्छित नसतात व ते टाळण्याचा प्रयत्न करीत राहतात. अशावेळी आई-वडिलांचे हे कर्तव्य असते की, ज्या कामाची मुलाला आवड नसेल त्या कामाची त्याच्यात आवड निर्माण करावी व त्याच्याकडून ते काम करून घेण्याचाप्रयत्न करावा. यासाठी त्या कामाची आवड नसण्याचे कारण जाणून ते दूर केले जावे.उदा. रात्री मुलाला दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले जाते तेव्हा ते टाळाटाळ करू लागते. कदाचित यामागे मूल अंधारात एकटे जाण्यास घाबरतही असू शकते.
अशावेळी त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा.कित्येकदा मुलांना एखादे काम करण्यास सांगितले जाते तेव्हा त्याला ते काम करण्याचा हेतू समजावला जात नाही.अशा स्थितीत मुलाला हे कहत् नाही की ते काम केल्यामुळे काय फायदा हाेईल व ते टाळाटाळ करीत राहते. आई-वडिलांनी काेणते काम सांगताना ते करण्याचा हेतू मुलांना व्यवस्थित समजावून सांगायला हवा. यामुळे मुलांना काम करण्याची प्रेरणा मिळत राहील व त्यात त्यांना गाेडी वाटेल.कित्येकदा टाळाटाळ करण्याचे कारण मुले शारीरिक वा मानसिक रुपाने अशक्त असणे हेही कारण असते. अशावेळी ती काेणतेहीकाम व्यवस्थितपणे करू शकत नाही. जर मूल मानसिक रुपात अस्वस्थ असेल तर त्याला एखाद्या मानसाेपचार तज्ज्ञाला दाखवायला हवे. जर ते शारीरिक रुपात अशक्त असेल तर डाॅ्नटरांना दाखवून त्याच्यावर उपचार करायला हवेत.