महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजपासून दादर स्थानकात चाेख बंदाेबस्त ठेवणार

05 Dec 2025 23:44:49
 
 

dadar 
 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर 5 डिसेंबरच्या रात्री 12 पासून ते शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री 12 या कालावधीत दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 400 लाेहमार्ग पाेलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे दादर लाेहमार्ग पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जाेडणारा माेठा पूल व फलाट क्र. 12 वरील सर्व प्रवेशद्वारे शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येण्यासाठी बंद राहतील. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पूल खुला राहील. पूर्व-पश्चिम शहर हद्दीतून येणारे अनुयायी व दैनंदिन प्रवाशांना दादर स्थानकातील फलाटावर येण्यास खुला राहील.
 
Powered By Sangraha 9.0