मुंबईच्या वाहतुकीस माेठा दिलासा मिळणार : मुख्यमंत्री

05 Dec 2025 23:45:53
 
 

CM 
पूर्व मु्नत मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईत 20 ते 25 मिनिटांत पाेहाेचता येते; मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक काेंडीत अडकावे लागत हाेते. तसेच, पश्चिम उपनगरे आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत हाेता. या समस्येवर ताेडगा म्हणून ऑरेंज गेट बाेगद्याची संकल्पना मांडण्यात आली. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस माेठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाशहरातील वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बाेगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. टनेल बाेरिंग मशीनचे (टीबीएम) लाेकार्पण करण्यात आले.
 
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, काैशल्य, विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, आमदार अमीन पटेल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित हाेते.हा बाेगदा पूर्व आणि पश्चिम मुंबईला जाेडणार असून,नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचवेल. मेट्राे 3, मेट्राे 2 ए, मेट्राे 7 सारख्या प्रकल्पांनी शहराला जसा दिलासा दिला, तसाच हा भूमिगत बाेगदाही वाहतूक व्यवस्थेचा चेहरामाेहरा बदलणार आहे. हा बाेगदा मेट्राे 3 च्या खाली जात असल्याने हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वाेत्तम नमुना असल्याचे शिंदे यांनी सांगितले.या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बाेरिंग मशीन असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तरासाठी अचूक व सुरक्षित खाेदकाम करणारी यंत्रणा आहे.
Powered By Sangraha 9.0