तुम्ही ज्या सेंटेड कॅण्डल्स वापरता, त्या सेफ आहेत का?

05 Dec 2025 23:53:06
 

candle 
 
मागील काही वर्षांत सेल्फकेअर रुटीन आणि हाेम डेकाॅरमध्ये सेंटेड कॅण्डल्सचा वापर वाढला आहे, पण सुंदर सुगंध देणाऱ्या आणि आकर्षक दिसणाऱ्या या कॅण्डल्स तुमच्या आराेग्यासाठी कसा प्रभाव टाकतात हे जाणणे आवश्यक आहे.दिवसभराच्या थकव्या नंतर स्ट्रेस-फ्री हाेण्यासाठी आणि रिलॅक्स फील करण्यासाठी, झाेप चांगली यावी यासाठी रात्री झाेपण्या आधी मेडिटेशन आणि याेग करते वेळी मन शांत कारण्यासाठी आणि ध्यान केंद्रित करण्यासाठी, घरातील दुर्गंध दूर कारण्यासाठी आणि फ्रेशनेस वाढवण्यासाठी, गिफ्टमध्ये देण्यासाठी तसेच डिनर टेबलावर किंवा बेडरूममध्ये वातावरण निर्मिती कारण्यासाठी, अशा विविध कारणास्तव मागील काही वर्षांमध्ये सेंटेड कॅण्डल्सचा वापर वाढला आहे. परंतु कळत-नकळतच बरेच लाेक सेंटेड कॅण्डल्सची पसंती करण्यात चूक करत असतात आणि परिणामी आराेग्याला गंभीर हानी पाेहचते.कॅण्डल्स पॅराफीन वॅक्स (पेट्राेलियमबेझ्ड) पासून बनल्या असतील आणि त्यांमध्ये आर्टिफिशीयल फ्रॅग्रन्स आणि केमिकल डायचा वापर झाला असेल तरत्या आराेग्यासाठी हानिकारक आहे.
 
ह्या कॅण्डल्स हवेमध्ये विषारी तत्वे आणि धूर साेडतात. दीर्घ काळा पर्यंत हा धूर श्वासामार्फत शरीरात गेल्यास समाेर धाेका उभा राहताे. अशा प्रकारच्या सेंटेड कॅण्डल्स स्वस्त असतात म्हणून लाेक त्याखरेदी कारण्यासाठी माेहास बळी पडतात.आपण जेव्हा पॅराफीन वॅक्सपासून बनलेल्या सेंटेड कॅण्डल्स पेटवताे, तेव्हा त्या हळूहळू हवेमध्ये अशी रासायनिक तत्वे साेडतात की आपल्या आराेग्याला हानी पाेहचू शकते. हे तेच रसायन आहे जे औद्याेगिक आणि वाहनांच्या धुरामध्येही आढळून येतात.जेव्हा एखादी व्यक्ती अशा रूममध्ये बसली असेल जिथे ही कॅण्डल जळत असेल, तर नकळतपणेच हे विषारी कण श्वासा मार्फत शरीरात जातात. यामुळे फुफ्फुसात जळजळ हाेणे, खाेकला येणे, श्वास घेण्यास त्रास हाेणे आणि दीर्घ काळासाठी अस्थमा किंवा एलर्जी यांसारख्या समस्या हाेऊ शकतात. या व्यतिरिक्त, काही लाेकांना त्यांच्या धुराने डाेकेदुखी किंवा थकव्याची तक्रार असतात. त्यांमध्ये असलेला आर्टिफिशल फ्रॅग्रन्स या सगळ्या समस्यांना जास्त खराब बनवताे. त्यामध्ये अशी रसायने असतात की जी हाॅर्माे नच्या बॅलन्सला प्रभावित करू शकतात.
Powered By Sangraha 9.0