आधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा समावेश आहनाैदलाच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा गाठत माझगाव डाॅक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेल्या निलगिरी वर्गातील (प्राेजेक्ट 17 ए) चाैथ्या प्रगत स्टील्थ फ्रिगेट ‘तारागिरी’ युद्धनाैकेचे नुकतेच जलावतरण करण्यात आले.युद्धनाैकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे हे माेठे उदाहरण आहे. प्रकल्प 17 ए मधील युद्धनाैका विविध प्रकारच्या माेहिमांसाठी तयार करण्यात आल्या असून, सागरी क्षेत्रातील सर्व आव्हानांना ताेंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे. तारागिरी हे नाैदलात 1980 ते 2013 दरम्यान 33 वर्षे सेवा देणाऱ्या लेअँडर-श्रेणीतील माजी आयएनएस तारागिरीचे नवे रूप आहे.नव्या पिढीची ही अत्याधुनिक युद्धनाैका नाैदल डिझाइन, स्टेल्थ, अग्निश्नती, स्वयंचलन आणि टिकाऊपणाच्या क्षमतेतील एक माेठी झेप दर्शवते.
वाॅरशिप डिझाइन ब्यूराेने याचे डिझाइन केले असून, वाॅरशिप ओव्हरसिंग टीमच्या देखरेखीखाली इंटिग्रेटेड कन्स्ट्रक्शन पद्धतीने ही युद्धनाैका बांधण्यात आली आहे. तारागिरीमुळे डिझाइन, अभियांत्रिकी व जहाजबांधणीतील देशाचे काैशल्य अधाेरेखित झाले आहे. नाैदलाच्या अत्याधुनिक, बहुउपयाेगी, स्टील्थ युद्धनाैकांच्या मालिकेत तारागिरीची भर पडणे ही सुरक्षित आणि स्वावलंबी सागरी भविष्याच्या दृष्टीने माेठे पाऊल मानले जात आहे.शस्त्रास्त्र आणि सेन्सर्स संचात ब्राह्माेस सुपरसाॅनिक क्षेपणास्त्रेएमएफएस्टार रडार आणि एमआरएसएएम क्षेपणास्त्र प्रणाली, 76 एमएम एसआरजीएम ताेफ, 30 एमएम आणि 12.7 एमएम क्लाेज-इन वेपन सिस्टीमचा समावेश आहे; तसेच पाणबुडीविराेधी युद्धासाठी राॅकेट आणि टाॅर्पेडाेही नाैकेवर बसवलेले आहेत.या अत्याधुनिक युद्धनाैकेत शिवालिक श्रेणीपेक्षा अधिक उन्नत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा समावेश आहे.