डंपर पुलाखाली अडकून 15 फूट उंचावर गेला

04 Dec 2025 23:42:55
 

bridge 
 
जयपूरच्या साेडाला परिसरात मंगळवारी (11 नाेव्हेंबर) सकाळी 11.30 च्या सुमारास महापालिकेचा एक डंपर अचानक उंच पुलाखाली अडकला. डंपरचा वेग चांगला हाेता, कारण वाहतूक खूपच कमी हाेती; पण डंपर पुलाखाली जात असतानाच अचानक हायड्राॅलिक जॅक वर आला. त्यामुळे डंपरचा पुढचा भाग सुमारे 15 फूट वर आला.डंपरमध्ये भरलेला कचरा मागे पडला. सुरुवातीला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना डंपर अचानक का वर आला हे समजले नाही, कारण डंपरचा मागचा भाग वरच्या पुलावर आदळला, ज्यामुळे माेठा आवाज झाला.सुदैवाने मागून येणारी गाडी त्या वेगाने जात नव्हती अन्यथा ती डंपरला धडकली असती. जवळच्या चालकांनी ताबडताेब डंपर चालकाला खाली उतरण्यास मदत केली.संध्याकाळपर्यंत हा डंपर रस्त्यावर असाच उभा राहिला.
Powered By Sangraha 9.0