ब्रिस्क वाॅक सुपर मेडिसिन आहे

03 Dec 2025 23:08:40
 

walk 
 
निराेगी दीर्घायुष्य जगण्यासाठी शरीर अ‍ॅ्निटव्ह ठेवणे आवश्यक असते.विशेषज्ञ सांगतात की, ब्रिस्क वाॅक आपल्या शरीराला पूर्णपणे अ‍ॅ्निटव्ह ठेवते. ब्रिस्क वाॅक म्हणजे वेगाने चालणे. विशेषज्ञ मानतात की राेज फ्नत 20-30 मिनिटांचे ब्रिस्क वाॅक फक्त तणावच कमी करीत नाही तर मेंदू व शरीर दाेन्हीही फ्रेशनेसने भरते.
 
प्रथम जाणून घ्या : ब्रिस्क वाॅकचा साधासाेपा अर्थ आहे, सामान्य चालीपेक्षा थाेडे जास्त वेगाने चालणे. ब्रिस्क वाॅकसाठी एवढ्या वेगाने चाला की, आपला श्वास थाेडा तीव्र हाेईल पण आपण धापा टाकणार नाही. विशेषज्ञ ताशी 5-6 किलाेमीटर वेगाने चालण्यास ब्रिस्क वाॅक म्हणतात. यासाठी आपल्याला काेणत्याही खास उपकरणाची वा जिम मेंबरिशिपची गरज नसते तर गरज असते आरामदायक बूट व थाेड्याशा इच्छाशक्तीची.
 
कसे करते हे काम : जेव्हा आपण वेगाने चालता तेव्हा शरीरात एंडाेर्फिन हार्माेन रिलीज हाेत असते. ज्याला हॅप्पी हार्माेनही म्हणतात. एंडाेर्फिन हार्माेन आपला मूड उत्तम बनवते व तणाव कमी करते. यामुळेच ब्रिस्क वाॅकला नॅचरल एंटीडिप्रेशनही म्हणतात.
 
शरीरही सुदृढ : ब्रिस्क वाॅक एक प्रभावी व्यायाम आहे जे रक्ताभिसरण सुधारते व वजन कमी राखण्यात मदत करते. हे हृदयाच्या आजारांपासून वाचवते आणि डायबिटिज व हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. राेज वेगाने चालल्यास मेटाबाॅलिज्म उत्तम हाेते व कॅलरी वेगाने बर्न हाेते. ज्यामुळे शरीर फिट व ऊर्जावान राहते.
 
बाैद्धिक थकवा दूर : जेव्हा आपण माेकळ्या हवेत व निसर्गात चालताे तेव्हा मेंदूला अधिक जादा शांती मिळते. राेज 20-30 मिनिटांचा ब्रिस्क वाॅक आपला बाैद्धिक थकवा दूर करते. यामुहे झाेपेची गुणवत्ता सुधारते. चिंता व नैराश्याची लक्षणे कमी हाेतात व आत्मविश्वास वाढताे. अनेक शाेधांतून हे सिद्ध झाले आहे की, नियमित वाॅक करणाऱ्यांमध्ये तणावाची पातळी 40 ट्न्नयांपर्यंत कमी हाेते.
Powered By Sangraha 9.0