
संयु्नत राष्ट्रसंघाच्या प्रकल्प सेवा कार्यालयाने (यूएनओपीएस) मेसर्स टेकइन्व्हेन्शन लाइफकेअरमार्फत इथिओपियातील सार्वजनिक आराेग्य अधिकारी आणि लस तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाने परळच्या हाफकिन शिक्षण, संशाेधन आणि चाचणी संस्थेला लस विश्लेषणावरील विशेष प्रशिक्षणासाठी भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश दाेन्ही देशांमधील आराेग्य क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे. इथिओपियाच्या सार्वजनिक आराेग्य मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार हैलू अशेनाफी डेनिसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत हाफकिनच्या संचालिका डाॅ. सुवर्णा खरात यांनी केले. त्यांनी संस्थेतील संशाेधन उपक्रम, नवप्रकल्प आणि भविष्यातील संयु्नत सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय शिक्षण आणि संशाेधन संचालक डाॅ. अजय चंदनवाले आणि हाफकिन जैव औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. डाॅ. चंदनवाले यांनी दाेन्ही देशांमध्ये संयु्नत संशाेधन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याबाबत प्रस्ताव मांडला. या प्रशिक्षणादरम्यान विषाणूशास्त्र आणि सेल बायाेलाॅजी विभागाच्या सहायक संचालिका डाॅ. उषा पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पथक शिष्टमंडळाला मार्गदर्शन करणार आहे.