म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून नाशिक शहरातील 402 घरांसाठी जानेवारीत साेडत काढण्यात येणार आहे.या साेडतीच्या नाेंदणी, अर्जविक्रीस्वीकृती प्रक्रियेला म्हाडाच्या मुंबई मुख्यालयातील एका कार्यक्रमाद्वारे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. इच्छुकांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून, लवकरच साेडतीची तारीख जाहीर केली जाईल.महत्त्वाचे म्हणजे ही 402 घरे चालू बांधकाम प्रकल्पातील असून, आगाऊ अंशदान तत्त्वावर या घरांची विक्री नाशिक मंडळाकडून केली जात आहे. त्यामुळे साेडतीनंतर घराचा ताबा मिळण्यासाठीकाही वर्षे विजेत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, त्याचवेळी विजेत्यांना पाच टप्प्यांत घराची र्नकम भरण्याची तरतूद करण्यात आली आहे.नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवार येथे नाशिक मंडळाकडून गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. चुंचाळे शिवारात 138, पाथर्डी शिवारात 30, मखमलाबाद शिवारात 48, आडगाव शिवारातील 77 अशी एकूण 293 घरे अल्प गटातील आहेत.
सातपूर शिवारात 40, पाथर्डी शिवारात 35, आडगाव शिवारात 34 अशी एकूण 109 घरे मध्यम गटातील आहेत. या घरांच्या किमती 14 लाख 94 हजार 023 रुपये ते 36 लाख 75 हजार 023 रुपयांदरम्यान आहेत.या घरांची कामे सध्या सुरू असून, ही घरे पूर्ण हाेण्यासाठी काही वर्षे लागणार आहेत. मात्र, या घरांसाठी आताच साेडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.त्यानुसार नाशिक मंडळाने या घरांची आगाऊ अंशदान तत्त्वावर विक्री करण्यासाठी नाेंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात केली.https://housing. mhada.gov.inकिंवाhttps://mhada. gov.inया संकेतस्थळावर 23 डिसेंबरला रात्री 11.59 पर्यंत संगणकीय पद्धतीने अनामत र्नकम भरून अर्ज सादर करता येईल. 24 डिसेंबरला रात्री 11.59 पर्यंत आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रकमेद्वारे अर्ज दाखल करता येणार आहे.