प्रेमाच्या नात्यामधून तुम्हाला काय हवंय, याची नेहमी जाण ठेवा. एखाद्याशी तुम्ही नातं जाेडल्यावर ते काेणत्या कारणासाठी जाेडलं आहे, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.समाेरच्याबद्दल गंभीर नसाल, तर जाेडीदाराला याची कल्पना असू द्या, नाहीतर भविष्यात अडचणी उद्भवू शकतील. एकंदरीतच, नवीन नातं जाेडताना एकमेकांशी मनमाेकळा संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे.एकमेकांशी प्रामाणिक राहा. कुठलीही लपवाछपवी करू नका. या गाेष्टींमुळेच तुमच नातं जास्त काळापर्यंत टिकून राहातं. आधी एकमेकांचे चांगले मित्र बना.तुमची भेट ही मित्रमंडळींमार्फत झाली असेल, तर काहीकाळ एकमेकांचे मित्र बनून राहा.
मित्राच्या भूमिकेतून समाेरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडीनिवडी, इच्छा, सवयी जाणून घ्या. एकमेकांशी जुळवून घेणं शक्य असेल, तरच पुढचं पाऊल उचला.अनाेळखी व्यक्तीबराेबर नातं जुळवण्याची घाई चुकीची ठरू शकते. म्हणूनच त्या व्यक्तीला पारखून याेग्य निर्णय घ्या. उगाच रिलेशनशिपची घाई करू नका.सुरुवातीच्या काळात कुठल्याही सीरिअस कमिटमेंटशिवाय एकत्र वेळ घालवा. या भेटींमधूनच तुम्ही स्वतःच्या भावना तपासून पाहू शकता आणि त्या व्यक्तीलाही त्याच्या तुमच्या विषयीच्या भावना समजणं साेपं जाईल.