पैशाची याेग्य गुंतवणूक कशी करावी?

28 Dec 2025 15:53:20
 

Paisa 
 
 गुंतवणूक म्हणून जमिन आणि साेने घेण्याचा विचार बाजूला ठेवा. कारण राेकडसुलभता ही शेअरमधील गुंतवणुकीत किती तरी जास्त आहे.
 
 करिअरच्या सुरवातीच्या काळातच घर खरेदी करून स्वतःला माेठ्या ईएमआयशी बांधून घेऊ नका. पहिल्यांदा पाया म्हणून काही फायनान्शियल लिक्विड अ‍ॅसेट तयार करा आणि मग अचल संपत्ती घेण्याचा विचार करा.
 
 विमा म्हणजे गुंतवणूक नाही हे लक्षात घ्या. चांगला परतावा देणाचे आश्वासन देणाऱ्या विमा याेजनेला ठाम नकार द्या.कुठल्याही प्रकारेच रायडर नसलेला शुद्ध विमा घ्या. तुम्हांला आणि कुटुंबियांना आवश्यक तेवढा शुद्ध विमा (टर्म इन्शुरन्स) घ्या. तुम्ही विमा सुरक्षा कवच म्हणून घेत आहात हे लक्षात घ्या. परताव्याच्या अपेक्षेने विमा घेता तेव्हा हप्ता वाढताे. टर्म इन्शुरन्सचा हप्ता कमी असताे आणि तुम्हांला आवश्यक तेवढे सुरक्षा कवच प्राप्त हाेते.
 
 कधीही मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांच्या नावाने विमा पाॅलिसी खरेदी करू नका.
 
 चांगला परतावा आणि राेकडसुलभतेसाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा सर्वाेत्तम पर्याय आहे.
 
 स्वतःसाठी आणि कुटुंबातील (मुले, पत्नी आणि आईवडील) सर्वांसाठी पुरेसा आराेग्य विमा खरेदी करा. आराेग्य विम्याचा प्रीमियम हा पैशाचा अपव्यय आहे असे कधीही समजू नका. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त आणि निराेगी असता तेव्हाच आराेग्य विमा घ्या.
 
 मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांनी दिलेल्या गुंतवणूक सल्ल्यावर डाेळे झाकून विश्वास ठेवू नका. त्यांच्यासाठी ज्या गाेष्टी उपयु्नत ठरल्या असतील त्या तुमच्याबाबतीत ठरतीलच असे नव्हे.कधीही एमएलएमच्या (चेन मार्केटिंग) सापळ्यात अडकू नका.
Powered By Sangraha 9.0