नवी मुंबईतून मार्च अखेर आंतरराष्ट्रीय उड्डाण

28 Dec 2025 15:43:18
 

Navi 
 
नाताळच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक देशांतर्गत विमानाने आकाशात झेप घेतली. येत्या तीन महिन्यांत म्हणजे मार्च अखेरपर्यंत या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गाे वाहतूक सुरू केली जाईल, अशी माहिती सिडकाेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.सिडकाे भवनात पत्रकार परिषदेत सिंघल यांनी ही माहिती दिली. यावेळी सडकाेच्या परिवहन विभागाच्या महाव्यवस्थापक गीता पिल्लई उपस्थित हाेत्या. नवी मुंबईकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले आहे.
 
पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार प्रवाशांनी या विमानतळाचा अनुभव घेतल्याची माहितीही सिंघल यांनी दिली.अवघ्या 20 दिवसांत म्हणजे 15 जानेवारीनंतर प्रतिदिन 48 विमानांची ये-जा अपेक्षित आहे. वार्षिक 9 काेटी प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानतळावर पहिल्या वर्षी दाेन काेटी प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कार्गाे वाहतूकही पहिल्याच दिवसापासून सुरू झाली आहे.या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी हाेणार असून, मुंबई महानगर प्रदेशाला दाेन विमानतळांचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे उद्याेग, व्यापार, पर्यटन आणि राेजगार संधींना माेठी चालना मिळेल, असा विश्वास सिंघल यांनी व्य्नत केला.
Powered By Sangraha 9.0