आपले मन आणि पाेट यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. वैज्ञानिक भाषेत याला गटब्रेन कनेक्शन असे म्हटले जाते.आपल्या पचनसंस्थेत असलेले उपयुक्त जिवाणू मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात.आपण काय खाताे, यावर या जिवाणूंची संख्या आणि गुणवत्ता अवलंबून असते.त्यामुळे चुकीचा, असंतुलित आहार थेट मानसिक आराेग्यावर परिणाम करताे.
संतुलित आहार = स्थिर मन ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये आणि याेग्य प्रमाणातील प्रथिने हे घटक केवळ शरीराला नव्हे, तर मनालाही बळ देतात.हिरव्या पालेभाज्यांमधील फाॅलिक अॅसिड, केळी आणि दूधातील व्हिटॅमिन बी, बदाम व अक्राेडातील ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे घटक तणाव कमी करण्यास, जंक फूड व मानसिक अस्वस्थतता आजच्या तरुण पिढीत जंक फूड, फास्ट फूड, गाेड पदार्थ आणि साखरयुक्त पेये यांचे प्रमाण वाढले आहे. हे पदार्थ क्षणिक आनंद देतात, मात्र नंतर थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि नैराश्य वाढवतात. साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडवतात, ज्याचा परिणाम मानसिक अस्वस्थतेत हाेताे.
पाणी, झाेप आणि वेळेवर जेवण मानसिक आराेग्यासाठी केवळ काय खाताे हेच नव्हे, तर कसे आणि केव्हा खाताे हेही महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी न पिणे, वेळेवर न जेवणे आणि अपुरी झाेप यामुळे चिडचिड, तणाव आणि निर्णयक्षमता कमी हाेते. दिवसातून किमान 78 तासांची