भिवंडीत बनावट कंपन्यांद्वारे 22 काेटींची फसवणूक

28 Dec 2025 15:50:51
 

GST 
 
आठ बनावट आणि बेकायदा कंपन्या स्थापन करून शासनाकडून 22 काेटी 3 लाख 49 हजारांचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) परतावा मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुद्ध राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाचे राज्य निरीक्षक अमर दाेंदे यांनी महात्मा फुले पाेलीस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.डायनामिक एंटरप्रायझेसचे मालक निखिल गायकवाड, नूर माेहंमद वासिम पिंजारी, नवनाथ सुकऱ्या घरत आणि सरफराज (रा. गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यामधील निखिल सिव्हिल इंजिनिअर आहेत. नूर पिंजारी रिक्षाचालक, नवनाथ घरत रिअल इस्टेट मध्यस्थ आणि सरफराज ही अज्ञात व्य्नती गुप्तपणे या व्यवहारात सामील असल्याचा राज्य जीएसटी अधिकाऱ्यांना संशय आहे.
 
या बनावट कंपन्यांच्या संदर्भातील तक्रार राज्य कर सहायक आयु्नत सीमा रहातेकर यांनी राज्य सेवा कर उपायु्नतांना सादर केली हाेती. या प्रकरणाची एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाचे राज्य निरीक्षक अमर दाेंदे यांनी चाैकशी केली. या चाैकशी प्रकरणात धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत. आठ बनावट कंपन्या स्थापन करून काेणत्याही प्रकारच्या मालाची हालचाल न करता केवळ बिजके तयार करून वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळण्यासाठी या कंपन्यांचा बनाव रचला गेल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कंपनी, निवासस्थानांच्या पत्त्यावर अधिकाऱ्यांनी चाैकशी केली. त्यावेळी त्यांना त्या कंपन्याच अस्तित्वात नसल्याचे समजले.
 
आपण या व्यवहारांविषयी अनभिज्ञ आहाेत. नूर पिंजारीच्या सूचनेप्रमाणे आपणास आर्थिक माेबदला मिळावा म्हणून आपण वस्तू आणि सेवा कराची नाेंदणी केली हाेती. आपल्या वस्तू आणि सेवाकर नाेंदणीवर काही व्यवहार झाले आहेत हे माहिती नाही, असा दावा डायनामिक एंटरप्रायझेसचे मालक निखिल गायकवाड यांनी चाैकशीत केला.नूर पिंजारी रिक्षाचालक आहे.बनावट बिजके तयार करण्याचे ते मुख्य सूत्रधार आहेत. सरफराजच्या सूचनेवरून आपण हे काम केल्याचे त्याने सांगितले.पण सरफराजची माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. नवनाथ घरत रिअल एस्टेट एजंट आहेत. बनावट जीएसटी क्रमांक मिळवून देण्यासाठी गाळा उपलब्ध करून देण्याचे कामे नवनाथ करत हाेते.नवनाथ घरत यांना पाेलिसांनी अटक केली आहे. इतर सात बनावट कंपन्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळल्याने त्यांच्याविरुद्ध जीसएटी विभागाने तक्रार दाखल केली आहे.
Powered By Sangraha 9.0