शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरू गाेविंदसिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जाेरावर सिंग (वय 9) आणि साहिबजादे बाबा फतेहसिंग (वय 7) यांच्या अद्वितीय शाैर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाताे.वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखवलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आपण स्वतः ला कृतीतून संकल्पित केले पाहिजे.साहिबजादांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून, त्यांचे शाैर्य सदैव प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सायनच्या गुरूद्वारा गुरू तेगबहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी वीर शहीद साहिबजादे यांना अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शाैर्याचे स्मरण केले. यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी कीर्तन, कविता वाचन केले आणि वीर शहीद साहिबजादे यांना आदरांजली अर्पण केली.यावेळी आमदार प्रसाद लाड व तमीळसेल्वन, श्री गुरू तेगबहादूर यांच्या 350व्या शहिदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक, पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, गुरुद्वारा समितीचे सदस्य दलजितसिंग, गुरुदेव सिंग आदी मान्यवर उपस्थित हाेते. बल मलकीत सिंग यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.