नवीन वर्षात कॅलेंडरबराेबर स्वतःमध्येही बदल करूया

28 Dec 2025 16:00:23
 


calender
 
 
माणसाची समस्या ही आहे की, ताे काल जसा हाेता, तसाच आजही राहताे आणि उद्याही. आपल्यात बदल व्हावा, म्हणून खूप कमी लाेक काम करतात. राेज कॅलेंडरच्या तारखा बदलतात.नवीन वर्षाचे नवे कॅलेंडरही भिंतीवर लावताे. पण, माणूस मात्र तसाच राहताे, जसा वर्षांपूवी हाेता. खरं म्हणजे आपण राेज जास्त ताजेतवाने हाेऊन नवा जन्म घ्यायला हवा. पण, आपण तर स्वतःला न बदलताच जगत आलाेय. त्याच त्या माॅडेल किंवा साॅफ्टवेअर बराेबर कॅरी फाॅरवर्ड हाेत असताे.स्वतःचे ऑडिट करा आपले विचार, अहंकार, कंजूसपणा, संकुचितपणा आदी आपल्या गुणांमध्ये पूर्वीपेक्षा काही फरक पडला आहेका याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःचे ऑडिट करू शकू.सुख, शांती आणि हेतुपूर्ण जीवन महत्त्वाचे राॅबीन शर्मा यांचे ‘हू विल क्राय, व्हेन यू डाय?’ हे पुस्तक प्रेरणादायी आहे. त्यामध्ये लेखक जीवनाला सार्थक, आनंदी कसे बनवावे, यावर प्रकाश टाकतात.
 
पुस्तकाच्या शीर्षकावरून असे वाटते की, हे पुस्तक मृत्यूचे तत्त्वज्ञान सांगत असावे. पण, यामध्ये जी 101 पावले (किंवा मार्ग) सांगितली आहेत, तशी स्वतःची जडणघडण केल्यास जिवंत असतानाच सुख, शांती आणि हेतुपूर्ण जीवन जगल्याचा परम आनंद प्राप्त झाल्याप्रमाणे हाेईल. जीवन सफल करण्याचे गुपित संत म्हणतात, तुम्ही जन्म घेता तेव्हा तुम्ही रडत असता आणि कुटुंबजन आनंदाने हसत असतात. तुमचे जीवन असे हवे की, मृत्यूच्यावेळी तुम्ही सुखाने जावे आणि जगाने रडावे! बस, असे साफल्य प्राप्त करण्याचे गुपित या पुस्तकामध्ये आहे.छाेट्या छाेट्या गाेष्टीतही माेठा आनंद आपल्याला छाेट्या छाेट्या गाेष्टीतही आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे आयुष्य अधिक सुंदर हाेते. खूप कमी पैसे किंवा शून्य पैसे खर्च करून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकताे.
 
काँक्रीटच्या जंगलामध्येही घराच्या बाहेर काेकिळेचा आवाज ऐकू येतचं असताे. पण, राेजच्या तणावपूर्ण जगण्यात आपले त्याकडे लक्षच जातं नाही. आपल्या घराजवळ-गावात बाग, तळे, एखादे मंदिर किंवा एखादे ठिकाण असते, जिथे दूर-दूरहून पर्यटकयेतात. पण, आपण दाेन-पाच वर्षांत तिथे गेलेले नसताे. इतर लाेक आपल्याला ज्यासाठी नशीबवान मानतात, त्याची आपल्यालाच जाणीव नसते, असेही घडते.पूर्वीपेक्षा सुविधाजनक, आरामदायक जीवन मागच्या पिढीच्या आयुष्यात अधिक संघर्ष हाेता. त्यापेक्षा आजचे जीवन अधिक सुविधाजनक, आरामदायक आहे. तरीही ताण-तणाव आणि गाेंधळ का आहे, हे स्वतःला विचारले पाहिजे. आधीची पिढी घरातील पाेळी-भाजीत आनंद मानत हाेती.
 
आइसक्रीम तर शुभ प्रसंगीच मिळायचे. फळफळावळ आजारी पडल्यावर मिळायचे. पाणी आणि धान्यासाठी रांगेत उभे राहायला लागायचे. सध्याच्या पिढीने आत्ताच्या सुख-सुविधा, आरामशीर जीवन व वैद्यकीय संशाेधने, आर्थिक सुरक्षा आदींचा विचार करून स्वतःला नशीबवान समजून जीवनाचा जल्लाेष केला पाहिजे. पण, ताे जास्त डिप्रेशन, तणावात दिसताे. स्वतः ला सतत दुखी समजत आहे. आपल्यातील गुण हेच आपल्याला खऱ्या आनंदाची अनुभूती देतात. दया, अनुकंपा, हसरा चेहरा, सातत्याने शिकणे, विवेक या गुणांनी आनंद मिळताे. आपल्यात मूलभूत नैतिकता असल्यावरच भाैतिक आनंद अनुभवता येताे.दुसऱ्यांच्या सुखात सुखी झाल्यावर अद्वितीय आनंद मिळताे. ईर्षा, मिथ्याभिमान, अहंकार, घमंड यासारख्या सर्व अनिष्ट गाेष्टी आपण जिवंत असतानाच दफन केल्यास आपले जीवन दिव्य हाेईल. भाैतिकतेमध्येही आध्यात्मिकता दिसेल.
Powered By Sangraha 9.0