हळद : हळदीत व्हिटॅमिन ए, बी, सी आढळतात. ही गरम, वात, पित्त व कफ दूर करणारी असते. तसेच ताप, कुष्ठ, संधिवात व चर्मराेगही दूर करणारी असते. ही मार, सूज, फाेड जखम आणि हाड तुटणेही ठीक करते. हळकुंडाचा एक तुकडा भाजून दाताखाली दाबून धरल्यास दातदुखी बंद हाेते.हळदीच्या उटण्याने शरीर सुंदर व कांतिवान हाेते. हळद, चुना व मध समभाग घेऊन व्यवस्थित मिसळून दुखऱ्या भागावर लावल्यास संधिवाताच्या सूजेत फायदा हाेताे.हळकुंड भाजून रात्री झाेपताना ताेंडात ठेवल्यास पडसे, कफ व खाेकल्यात फायदा हाेताे.हळकुंड तुपात भाजून चूर्ण बनवून साखरेत मिसळून काही दिव राेज खाल्ल्यास मधुमेह व इतर प्रमेह राेगांमध्ये फायदा हाेताे. हळद व साखर पाण्यात मिसळून प्याल्यास मूर्च्छा राेग बरा हाेताे. हळदीत चुना मिसळून मु्नया मारावर लेप केल्यास सूज व दुखणे कमी हाेते.हळदीचा धूर नाकाने घेतल्यास सर्दीपडशात त्वरित आराम मिळताे.हळकुंड थाेड्याशा पाण्यात उगाळूगरम करून विंंचू वा इतर जंतूच्या डंखावर लेप केलातर फायदा हाेताे.
हिंग : हिंग गरम, तीक्ष्ण, वात, कफ आघि शूल नष्ट करताे आणि पित्त प्रकाेपक असते. हे चवीला कडू व उश्ण वीर्यअसते व अन्न पचण्यास लाभदायक असते. जेवणात रुची उत्पन्न करते.हिंग बडीशेपच्या अर्कात दिल्यास मूत्रावराेधात लाभ हाेताे. हिंग पाण्याने धुऊन नाकात त्याचे थेंब टाकल्यास अर्धशिशीत आराम मिळताे.हिंग पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातदुखी दूर हाेते. दाताच्या पिवळ्या भागात हिंग भरल्यास दंतकृमी नष्ट हाेतात व दातदुखी थांबते.हिंगाच्या सेवनाने स्त्रीच्या याेनी व गर्भाशयाची शुद्धी हाेत असते. मासिक पाळी साफ व वेळेवर हाेऊ लागते.पाेटदुखी थांबते.पुढील चूर्ण बनवून घेतल्यास अनेक राेगांमध्ये फायदा हाेताे.
तुपात भाजलेले हिंग, सूंठ आणि काळी मिरी, पिंपळी, सेंधव मीठ, ओवा, पांढरे व शहाजिरे समभाग घेऊन या आठ वस्तू एकत्र मिसळून चूर्ण बनवून मजबूत झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावे. थाेडे चूर्ण जेवणापूर्वी खाल्ल्यास अजीर्ण, वायू, पाेटदुखी इ. राेग हे चूर्ण बरे करते.स्त्रीला मिरगी येत असेल तर काही दिवस दाेन ताेळे प्रमाणात शुद्ध हिंगाचा अर्क पाजल्यास ती बरी हाेते. गमर पाण्यासाेबत वाटाण्याएवढे हिंग प्याल्यास पाेटदुखी, अतिसार, उचकी व उलटीत लवकर आराम मिळताे.पाेटात गॅस हाेऊन पाेट फुगले असेल व दुखत असेल तर हिंग थाेड्याशा पाण्यात मिसळून नाभीच्या आजुबाजूला व पाेटावर त्याचा लेप केल्यास काहीच क्षणांमध्ये आराम मिळताे. मुलांच्या पाेटात मुरडा असेल तर त्यातही नाभीवर हिंगाचा लेप लावल्यास आराम पडताे.हिंग मधात मिसळून रईची वात बनवून पेटवून त्याचे काजळ बनवून दाेन्ही डाेळ्यांत घातल्यास दृष्टी वाढते व डाेळ्यांचे विकारही बरे हाेतात.