हन्ना फ्रेझर नावाची ऑस्ट्रेलियातील 51 वर्षीय महिला जलपरीसारखी काम करते आणि त्याच कामातून खूप पैसे कमवते.ती एक व्यावसायिक जलपरी आहे, म्हणजेच एक मासा.ती 9 वर्षांची असताना तिने एक चित्रपट पाहिला ज्यामध्ये एक व्यक्ती पाण्यात माशासारखी पाेहत हाेती. त्यावेळी तिने ठरवले की ती देखील जलपरी बनणार.तिच्या आईच्या मदतीने तिने प्लास्टिकची चादर आणि उशी बांधली आणि पायांनी माशासारखी शेपटी बनवली आणि स्विमिंग पूलमध्ये पाेहायला सुरुवात केली. यासाठी तिला खूप कमी प्रशिक्षणाची गरज लागली. ती तिच्या पायात माशासारखे पंख ठेवते आणि पाण्यात खऱ्या माशासारखा पाेहते. याबराेबरच ऑक्सिजन मास्कशिवाय बराच वेळ ती पाेहू शकते. जर तिने एकदा डुबकी मारली तर सुमारे 4 मिनिटांत पाण्याखाली 50 फूट खाेल जाऊ शकते आणि माशासारख्या यु्नत्या करू शकते.हा तिचा छंदच तिचा व्यवसाय बनला आहे.