ओशाे - गीता-दर्शन

27 Dec 2025 22:06:25
 

Osho 
 
कारण, ज्याच्यात रस घ्यायचा ताे हजर असेल की नसेल हे माहीत नसतं. तेव्हा गैरहजेरी आणखी जास्त पकड घेते, जाेरानं पकड घेते.रवींद्रनाथांनी कुठेतरी थट्टेनं लिहिलं आहे ज्या पती-पत्नींना आपणामधील प्रेम जिवंत ठेवायचं असेल त्यांनी अधूनमधून एक-दुसऱ्यापासून सुट्टी घेत राहावी, हाॅलिडे ठेवावेत. रवींद्रनाथांच्या एका पात्राला त्याची प्रेयसी ताे लग्नासाठी खूप मागे लागल्यावर म्हणते-‘ठीक आहे आपण करूया लग्न’. ते पात्र म्हणते ‘मी तुझ्याशी विवाह करीन पण तुझी ही जी दुसरी अट आहे, ती काही माझ्या डाे्नयात शिरत नाही.’ कारण तिची अट अशी आहे की, ‘विवाह तर करूच, पण सराेवराच्या एका किनाऱ्यावर मी राहीन आणि दुसऱ्या किनाऱ्याला तुम्ही रहाल.
 
अन् मग कधी कधी एकमेकांना आमंत्रण देऊन आपण भेटत राहू किंवा सराेवरात नाव वल्हवताना किंवा नदीकाठाने फिरताना जर गाठ पडली तर काेणत्यातरी झाडाखाली बसून गप्पा मारू.’ मग ताे पुरुष म्हणताे ‘असं जर असेल तर मग लग्न करायचंच कशाला? आपण विवाह न केलेलाच बरा नाही का?’ पण ती स्त्री म्हणते, ‘विवाह तर करूच, पण थाेडं अंतर ठेवून राहू. त्यामुळं एकमेकांना दुसऱ्याची आठवण येत राहील. एकमेकांना आपण विसरणार नाही. कुठं असं हाेऊ नये की खूपच जवळ राहिलं तर आपण एकमेकांना विसरूनच जाऊ.’ गैरहजेरीमुळे आठवणीला तजेला येताे. म्हणून गर्दीत आहात असं समजू नका.
Powered By Sangraha 9.0