गुगल, स्टारक्लाउड आणि एथरफ्लक्स अंतराळात डेटा सेंटर बांधण्याच्या तयारीत

27 Dec 2025 22:18:18
 

google 
 
2025 मध्ये डेटा सेंटरमध्ये 61 अब्ज डाॅलरची गुंतवणूक करण्यात आली. या गुंतवणुकीनंतर अणुऊर्जेवर चालणाऱ्या डेटा सेंटर्स, पाण्याखालील डेटा सेंटर्सची चर्चा सुरू झाली. दरम्यान, गुगल, एथरफ्लक्स आणि स्टारक्लाउड यांसारख्या कंपन्या पृथ्वीवर डेटा सेंटर्सऐवजी ऑर्बिटल डेटा सेंटर बांधण्याची याेजना आखत आहेत.येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अवकाशात साैर ऊर्जा आहे, जमीन संपादनासारखे काेणतेही अडथळे नाहीत आणि जास्त पाण्याच्यावापराच्या तक्रारी दूर हाेत आहेत.एआयचा वापर वाढत असल्याने, ग्रिडवरील दबाव वाढत आहे. दरम्यान, माेठ्या कंपन्यांनी अवकाशात डेटा सेंटर बांधण्यासाठी आवश्यक चाचण्या सुरू केल्या आहेत. गुगलने ‘प्राेजेक्ट सनकॅचर’सह अंतराळात चाचण्या सुरू केल्या आहेत. अहवालानुसार, ते कक्षेत एनव्हीडिया ॠझण चालवत असून, ते लेसर लिंकशी जाेडलेले आहेत.गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी प्राेजेक्ट सनकॅचरबद्दल सांगितले की, अंतराळात आपण साैर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करू शकताे.
 
पृथ्वीपेक्षा अंतराळात 1 ट्रिलियन पट जास्त ऊर्जा आहे.भविष्यात अवकाश-आधारित डेटा सेंटर सामान्य हाेतील. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल उपग्रह इमेजिंग फर्म प्लॅनेटसाेबत भागीदारीत अंतराळ डेटा सेंटर बांधणार आहे. यासाठी ते दाेन पायलट उपग्रह देखील प्रक्षेपित करणार आहे.गुगल ही एकमेव कंपनी नाही जी अंतराळ डेटा सेंटर बांधण्याची तयारी करत आहे.एनव्हीडियासमर्थित स्टार्टअप स्टारक्लाउडने आपला पहिला एआय-सुसज्ज उपग्रह अवकाशात पाठवला आहे.सीईओ फिलिप जाॅन्स्टन म्हणाले की, अंतराळ डेटा सेंटर 10 पट कमी कार्बन उत्सर्जित करतील.अंतराळ ऊर्जा स्टार्टअप एथरफ्लक्स गॅलेक्टिक ब्रेन, एक ऑर्बिटल डेटा सेंटर बांधत आहे.अलीकडच्या वर्षांत अंतराळात वापरल्या जाणाऱ्या एआय हार्डवेअर, उपग्रहांची किंमत कमी झाली आहे. मॅककिन्सेच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत पृथ्वीवर डेटा सेंटर चालवण्यासाठी 5 ट्रिलियन डाॅलर्स (सुमारे 44,76,25,00,00,00,000 रुपये) पेक्षा जास्त खर्च येईल.
Powered By Sangraha 9.0