अत्यंत मनमाेहक रंगांची मंत्रमुग्ध करणारी कलाकृती जितकी सुंदर असते तितकीच ती काही वेळा प्राणघातकही ठरते. इथे अशाच एका मशरूम वापरून केलेल्या कलाकृतीबाबत आपण माहिती घेणार आहाेत. उस्मान डिंच नावाच्या कलाकाराने ही संकल्पनात्मक कलाकृती तयार केली आहे. मात्र यात वापरलेले विविध आकारांचे आणि रंगांचे मशरूम हे जगातील सर्वांत विषारी मशरूम आहेत.ही कलाकृती बनवण्यामागे त्यांचा हेतू असा आहे की लाेकांना हे समजले पाहिजे की काेणीही काेणत्याही गाेष्टीच्या देखाव्यावर जाऊ नये.
यासाठी, त्यांनी जगातील सर्वात विषारी मशरूम प्रजाती गाेळा केल्या आणि त्यांना नैसर्गिकरीत्या सुकू दिले. नंतर त्यांनी त्यांना अशा प्रकारे व्यवस्थित केले की ते एका महाकाय गाेल पिझ्झासारखे असेल. उस्मानने ही कलाकृती ‘पिझ्झा डिश’ म्हणून सादर केली आहे.लाेक कलाकृतीच्या सुंदर तुकड्याने मंत्रमुग्ध हाेतात, परंतु जसजसे ते जवळ येतात आणि त्यात वापरलेले मशरूम किती प्राणघातक आहेत हे जाणून घेतात, तसतसे ते घाबरतात. उस्मान म्हणतात की, त्यात इतके विषारी मशरूम वापरले गेले आहेत, की ते फक्त जिभेवर ठेवल्यानेही माणसाचा मृत्यू हाेऊ शकताे.