समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय याेजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांची कामे संवाद आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गतिशीलतेने करावीत, असे निर्देश विभागीय आयु्नत डाॅ. जितेंद्र पापळकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेत डाॅ. पापळकर बाेलत हाेते. निवृत्त विभागीय आयु्नत भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर पाेलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठाेड यांच्यासह विविध कार्यालयांचे विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते.
भास्कर मुंडे यांनी साध्या आणि साेप्या पद्धतीने प्रशासन हे सुशासन कशा पद्धतीने करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. सुशासन सप्ताहांतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात दस्तावेज प्रमाणीकरणाविषयी माहिती तंत्रज्ञान अधिकारी शरद दिवेकर यांनी सादरीकरण केले; तसेच श्रीमती माळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने राबवलेल्या दशसूत्री उपक्रमांची माहिती दिली.