ऊर्जा वाढवून सर्दीपासून वाचवणारे उपयु्नत याेग

23 Dec 2025 23:21:18
 

yog 
1. उज्जाई प्राणायाम शरीर सैल करून आरामदायक स्थितीत बसा. सामान्य अवस्थेत श्वास घ्या. हळू हळू श्वास घशात जाणवा.आता थाेडासा घसा संकुचित करा ज्यामुळे श्वास येण्या-जाण्यात मंदसा आवाज यावा. आता दीर्घ व खाेल श्वास घ्या. असे 10 ते 20 मिनिटे करा. जर बसायला त्रास हाेत असेल तर हा बसून वा झाेपूनही करू शकता.
 
2. सिंहासन याेग पायांचे पंजे क्राॅस करून गुडघ्यांवर बसा. गुडघे पसरा. दाेन्ही हात जमिनीवर टेकवा. बाेटे आपल्याबाजूला वळवा.
ताेंड उघडे ठेवा आणि जीभ जेवढी जमेल तेवढी बाहेर काढा. डाेळे पूर्णपणउघडे ठेवा. आता नाकाने दीर्घश्वास घ्या आणि हळू हळू साेडत घशातून सिंहगर्जनेसारखा आवाज काढा.एक एक मिनिटाच्या अंतराने हे तीन वेळा करा.
 
3. कपालभाती आरामदायक आसनात बसा. डाेके, पाठ सरळ ठेवत हात गुडघ्यांवर ठेवा.डाेळे मिटून शरीर सैल साेडा. आता नाकाने खाेल श्वास घ्या व पाेटाचे स्नायू आकसत श्वास थाेड्या वेगाने साेडा. श्वास आरामात घ्या. यात काेणत्याही प्रकारचा जाेर लावू नका.सुरुवातीला दहा वेळा श्वास घेण्याची व साेडण्याची प्रक्रिया करा. ही तीन ते पाच वेळा पुन्हा करा.
Powered By Sangraha 9.0