वाचनाच्या सवयीतून विचारी मन घडते

23 Dec 2025 23:23:57
 

read 
 
मुले ही ओल्या मातीसारखी असतात. त्यांना आकार द्यावा तशी ती घडत जातात. मुलांची चांगल्या प्रकारे जडणघडण करणे आणि देशाचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये साेपवणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. त्यासाठीच मुलांना वाढवताना त्यांना वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे.
 
त्यासाठीचे काही उपाय: पहिल्या दिवसापासून वाचन करा: जेव्हा नवजात मूल आईबराेबर रुग्णालयातून घरी येते त्या दिवसापासून आईने मुलाला घेऊन वाचन सुरु केले पाहिजे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, कथा-कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तके, चरित्रे अशी पुस्तके बाळाला ऐकू येईल अशा आवाजात आणि तालात वाचली तर बाळही त्याला प्रतिसाद देऊ लागते. आई जर राेज बाळाला मांडीवर घेऊन वाचू लागली तर बाळही वाचन संस्कार स्वीकारत माेठे हाेईल.
 
तुम्ही वाचत असल्याचे दिसू द्या: तुम्ही पुस्तके, मासिके किंवा ब्लाॅग वाचत असलात तरी तुम्ही नियमितपणे वाचन करता हे मुलांना दिसले पाहिजे. मुले निरीक्षणातून शकत असतात आणि आईवडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही नियमितपणे वाचन करता, त्यावर मुलेही वाचनाचा उत्साह स्वतःमध्ये आणतील.
 
वाचनाची जागा तयार करा: वाचनाची जागा ार माेठी असावी किंवा तिथे पुस्तकांची कपाटे असावीत अशी अजिबात कल्पना नाही. अगदी साेफ्याचा काेपरा किंवा मुलांच्या खाेलीतील खुर्ची देखील वाचनाची जागा असू शकते. पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असली की कुठल्याही जागी वाचन करता येते. त्याठिकाणी एक-दाेन पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे ठेवायला सुरवात करा.
तुम्ही तिथे वाचायला बसता असे लक्षात आले की, मुलेही तिथे बसून वाचू लागतील
Powered By Sangraha 9.0