हवामान बदलाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या ट्राफेना मुथाेनीने झाडांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी झाडाला मिठी मारण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, तिने केनियाच्या न्येरी शहरात सतत 48 तास झाडाला मिठी मारण्याचा विक्रम केला हाेता.लाेकांना पर्यावरणाचे महत्त्व सतत समजावून सांगावे लागते असे तिचे मत असले तरी, ट्राफेना म्हणते की, जंगले ताेडली जात आहेत याकडे लाेकांचे लक्ष वेधणे खूप महत्त्वाचे आहे.यावेळी तिने स्वतःचा विक्रम माेडला आणि 72 तास झाडाला मिठी मारण्याचा प्रकल्प हाती घेतला. यासाठी तिने विशिष्ट ड्रेस परिधानकेला हाेता. या कपड्यांमधून एक विशिष्ट संदेशही देण्यात आला.
या ड्रेसमध्ये वापरण्यात आलेला काळा रंग आफ्रिकेच्या ताकदीचे प्रतीक हाेते, हिरवा रंग पुनरुज्जीवनाच्या आशेचे प्रतीक हाेते, लाल रंग आदिवासींच्या धैर्याचे प्रतीक हाेते, आणि निळा रंग पाणी आणि समुद्राच्या संरक्षणाचे प्रतीक म्हणून वापरले गेले.झाडाला चिकटून राहण्याच्या प्रकल्पादरम्यान, ती 72 तास झाडाला चिकटून राहिली. 48 तासांनंतर, ती इतकी थकली हाेती की तिला चक्कर आल्यासारखे वाटले. तथापि, इतर कामगारांनी तिच्याशी बाेलून तिला जागे केले. 72 तास झाडाला चिकटून राहण्याचा गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड प्रस्थापित करून, ट्रिपेनाने पुन्हा एकदा लाेकांमध्ये अशी चर्चा सुरू केली आहे की जंगलांना जंगलताेडीपासून वाचवूनच जीव वाचवता येताे.