महापारेषण-महानिर्मितीमध्ये सामंजस्य करार: संयु्नत निविदा करणार सादर

23 Dec 2025 23:27:08
 
 

act 
 
राज्यातील वीजवहन यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महापारेषण आणि महानिर्मिती दरम्यान सामंजस्य करार झाला. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीव कुमार आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण प्रकल्पासाठी टॅरिफ बेस्ड काॅम्पिटिटिव्ह बिडिंग (टीबीसीबी) अंतर्गत संयु्नतपणे निविदा सादर करण्याचा निर्णय दाेन्ही वीज कंपन्यांनी घेतला आहे. महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) तृप्ती मुधाेळकर, मुख्य विधी सल्लागार विजय पाटील, मुख्य अभियंता (टीबीसीबी) अमित नाईक; तसेच महानिर्मितीचे संचालक (वित्त) मनेश वाघिरकर, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, मुख्य विधी सल्लागार डाॅ. कीर्ती कुलकर्णी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. या करारामुळे महापारेषणचा पारेषण क्षेत्रातील अनुभव आणि महानिर्मितीची माेठ्या वीज प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील तांत्रिक कार्यक्षमता एकत्र येणार आहे. 765 केव्ही श्रेणीतील प्रकल्पांसाठ
 
Powered By Sangraha 9.0