कधी एखाद्या गाेष्टीवरून वैतागणे, अचानक राग येणे वा एखाद्याला दटावणे या साऱ्या मानवी प्रतिक्रिया आहेत ज्या क्षणभराच्या असतात. मनात उठलेल्या असहमती व असंताेषाच्या लाटेसारखी.पण जेव्हा या लाटा वारंवार उसळू लागतात व व्यवहाराचा भाग हाेतात तेव्हा त्या हळू हळू शरीर व मन दाेन्हींवर नकारात्मक प्रभाव टाकतात.राग खरे तर शरीर व मेेंदूची त्वरित प्रतिक्रिया असते ती तेव्हा असते जेव्हा एखादी स्थिती आपल्या अपेक्षा वा मर्यादांच्या विपरीत असते. जर व्यक्ती आपल्या भावना याेग्यप्रकारे समजावू वा व्यक्त करू शकत नसेल तर हा राग आतल्या आत साठताे व एखाद्या छाेट्याशा गाेष्टीवर अचानक बाहेर पडताे.भूतकाळातील अनुभव रागीट वर्तनाचे मूळ असू शकते. व्यक्ती जुन्या वेदना टाळण्यासाठी राग वा संयमित व्यवहाराचा आधार घेते. हे एक भावनात्मक संरक्षण तंत्र आहे जे दीर्घकाळ हानिकारक ठरते.
रागाचा शरीरावर परिणाम रागीट स्वभाव शरीरात काॅर्टिसाेल व अॅड्रेनलीनसारख्या तणाव हार्माेनची पातळी वाढवताे. यामुळे रक्तदाब वाढू शकताे. ब्लडशुगर असंतुलित हाेऊ शकते आणि हृदयराेगाचा धाेका वाढताे. हृदयाची धडधड तीव्र हाेते, स्नायू ताणले जातात व जादा ऊर्जा खर्च हाेते. ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर शरीराचे संतुलन बिघडून निरनिराळे आजार जन्म घेऊ शकतात.
जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम जादा राग झाेपेचा अभाव, डाेकेदुखी, पाेटाचे त्रास व सतत थकव्यासारख्या समस्या वाढवताे.वाढता मानसिक तणाव प्रतिकारप्रणाली कमकुवत करताे. ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची भीती राहते.रागीट लाेकांमध्ये सामाजिक दुरावा व आत्मविश्वासाचा अभावही सामान्य असताे. डिप्रेशन, चिंता व तणाव राग वाढवतात व वारंवार राग आल्यामुळे मानसिक समस्यांचे गांभीर्यही वाढते. हे एक दुतर्फा चक्र बनते.
इतरांवरही परिणाम सतत नाखूश व चिडचिडे राहण्याचा परिणाम कुटुंब व सहकर्मचाऱ्यांवरही पडताे. ते रागीट माणसापासून दूर राहूलागतात. तेच रागीट वातावरणात मुले अस्थिर व चिडचिडी हाेऊ शकतात.यासाठी घरातील व ऑफिसातील वातावरण शांत आणि सकारात्मक राखणे मानसिक संतुलनासाठी आवश्यक आहे.रागाची प्रकृती समजून घ्या राग एक प्रकारचा अहंकार आहे, ज्यात माणसाला वाटते की, माझ्या हिताचा वा माझ्यासारखा निर्णय झाला नाही तर ताे निर्णय चूक आहे. त्याचा प्रतिकार करायला हवा. जग काेणा एकानुसार चालू शकत नसते.आपल्या मनासारखे काम झाले नाही तर आपण रागवाल.