सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तारा वाघिणीचा मु्नत संचार

21 Dec 2025 23:00:27
 
 

tiger 
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदाेलीच्या घनदाट नैसर्गिक जंगलात एसटीआर-05 ऊर्फ तारा वाघिणीने कुंपण ओलांडून यशस्वी मु्नत संचार केला. गेला आठवडाभर सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात (साॅफ्ट रिलीज) असलेली तारा अखेर सुरक्षित कुंपणातून बाहेर पडत थेट चांदाेली जंगलाच्या मध्यवर्ती भागात (काेअर झाेन) दाखल झाल्याची माहिती मानद वन्यजीवरक्षक राेहन भाटे यांनी दिली.
तारा वाघिणीला 13 डिसेंबरला येथे आणण्यात आले हाेते. जंगलात स्वतंत्र जीवनासाठीची तंदुरुस्ती सिद्धता हाेण्यासाठी तिला गेला आठवडाभर पिंजऱ्यात ठेवण्यात आले हाेते.या कालावधीत तिने नैसर्गिक शिकारीचे उत्कृष्ट काैशल्य दाखवत स्वतः शिकार केली. त्या शिकारीवरच सलग तीन दिवस उपजीविका केली. तिचे हे वर्तन जंगलातील स्वतंत्र जीवनासाठी ती पूर्णतः सक्षम असल्याचे स्पष्ट करते.महाराष्ट्र वन विभागाकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात ही मुक्तता शास्त्रीय पद्धतीने राबवण्यात आलेल्या
 
सुरक्षित, नियंत्रित वातावरणाच्या यशस्वी पूर्ततेनंतर करण्यात आली. ताराचे आराेग्य, हालचाली, वर्तन आणि परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता वनाधिकारी व वन्यजीव तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षणात ठेवण्यात आली आहे.सततच्या वर्तन निरीक्षण व पशुवैद्यकीय तपासणीनंतर तारा शारीरिक व वर्तनात्मकदृष्ट्या नैसर्गिक जंगलात मुक्त संचारास पूर्णतः याेग्य असल्याचे निष्पन्न झाले. मु्नततेनंतरही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून तिचे नियमित निरीक्षण व देखरेख करण्यात येणार असून, ती नैसर्गिक अधिवासाशी सुरळीतपणे जुळवून घेत असल्याची खात्री केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सह्याद्री व्याघ्र प्रकल्पक्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीवरक्षक राेहन भाटे, अजितकुमार पाटील, हृषिकेश पाटील, प्रदीप काेकीटकर यांच्यासह वनपाल व वनरक्षक सहभागी हाेते.
Powered By Sangraha 9.0