ज्येष्ठ नागरिकांचे डिजिटल युगातील स्क्रीन व्यसन धाेकादायक

21 Dec 2025 22:50:28
 

screen 
 
माेबाइल फाेनच्या घरातील बदलत्या परिस्थितीवर या लेखातून प्रकाश टाकता येईल.आता ‘मिलेनियल्स’ व ‘जनरेशन झेड’ त्यांच्या पालकांच्या स्क्रीनच्या व्यसनाबद्दल काळजीत आहेत. मानसशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ तज्ज्ञांच्या मते, जगाचे लक्ष किशाेरवयीन मुलांच्या साेशल मीडिया वापराकडे असताना, निवृत्त व्यक्ती- ज्यांच्याकडे अमर्याद रिकामा वेळ आहे आणि डिजिटल साक्षरता कमी आहे - चुकीच्या बातम्यांमध्ये व अल्गाेरिदमच्या चक्रात अडकत आहेत.
 
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे : मुख्य समस्या : अनेक ज्येष्ठांनी महामारीच्या काळात संपर्कात राहण्यासाठी स्मार्टफाेन वापरण्यास सुरुवात केली, परंतु आता त्यांना त्याचे व्यसन जडले आहे. तासन्तास, वेळेचा विचारही न करता व्हिडिओ पाहणे, जे काही स्क्रीनवर दिसते आहे ते सत्य मानणे आणि फाेन बाजूला ठेवण्यास सांगितल्यावर अपमान झाला, असे समजून चिडचिड करणे, अशी लक्षणे आहेत. जास्त वेळ माेबाइलवर वेळ घालवणे, ही कदाचित ज्येष्ठांसाठी समस्या नसेल, त्यामुळे हाेणारे मानसिक आजार मात्र समस्या आहेत.
 
आराेग्यावर परिणाम : डाॅ. प्रसून चॅटर्जी आणि डाॅ. यतन पाल सग बलहारा यांच्या मते, ‘ज्येष्ठांमध्ये वयाच्या आधीच विसरभाेळेपणा (डिमेन्शियासारखी लक्षणे दिसणे), एकाग्रतेचा अभाव व कशातच लक्ष न लागणे आणि एखाद्या समस्येला संथ प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. तसेच मानदुखी किंवा डाेळ्यांवर ताण येण्यासारखे शारीरिक त्रासही वाढत आहेत. तरुण पिढीबराेबरच वयस्कर लाेकांचे मानसिक आजार धाेक्यात आले, तर ही खूप माेठी सामाजिक समस्या ठरू शकते.’
 
मजकुराचा सापळा : तरुण पिढी साेशल मीडियावर स्वतः काहीतरी तयार किंवा निर्माण करत असते. मात्र ज्येष्ठ नागरिक केवळ समाेर येईल ते बघत राहतात, त्याने प्रभावित झाल्याने, त्यांना तेच सत्य वाटू लागते. त्यामुळे व्हाॅट्सअ‍ॅपवर येणारे घरगुती उपचारांचे मेसेज आणि एआय-निर्मित बनावट व्हिडिओंना ते लवकर बळी पडतात. तरुण मंडळी अनेक प्रकारची माहिती तरी तपासते, वृद्धांना मात्र जे काही दिसते ते खरे वाटल्याने, माहिती हा त्यांच्यासाठी सापळा ठरू लागला आहे.
 
कारण सापडत नाही : वयस्कर लाेक सामाजिक एकाकीपण कमी करण्यासाठी, निवृत्तीनंतरच्या रुटीनचा अभाव किंवा अंत नसलेला मजकूर उपलब्ध असणे, यातील मुख्य कारणे शाेधण्यात कमी पडत आहेत. काही वयस्कर मंडळी त्यांना हाेत असलेल्या आजारांविषयी माहिती शाेधत राहतात, वेळ जाण्याच्या पलीकडे हाती काहीच लागत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत, ज्येष्ठ व्यक्ती एकमेकांशी संपर्क करत, चालण्यासारखा व्यायाम करत, आता मात्र बहुसंख्य लाेक माेबाइलमध्येच गढून जातात.
 
 तज्ज्ञांचे विचार : ‘ज्येष्ठांवरील डिजिटल प्रभावाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, जितकी आपण मुलांच्या बाबतीत पाहताे. याचा परिणाम त्यांच्या शरीराची ठेवण आणि शारीरिक हालचालींपासून ते सामाजिक सहभाग, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेपर्यंत सर्व गाेष्टींवर हाेताे,’ डाॅ. समीर पारीख (फाेर्टिस हेल्थकेअर).‘हा वयाेगट (60+ वर्षे) केवळ मजकूर ग्रहण करणारा गट आहे. ते स्वतः काही तयार करत नाहीत, तर जे समाेर येईल ते बघतात.
 
यामुळे ते अल्गाेरिदम आणि कंटेंट लूपला बळी पडतात, जे त्यांना पूर्णपणे समजत नाही.’ - डाॅ.यतन पाल सिंग बलहारा (प्राध्यापक, एम्स, दिल्ली).‘माझ्या प्रॅक्टिसमध्ये, मला असे वयस्कर रुग्ण भेटत आहेत ज्यांची एकाग्रता कमी झाली आहे, प्रतिसाद देण्याचा वेग मंदावला आहे आणि शब्दसंग्रह किंवा अंकगणितीय क्षमता कमी हाेत आहे. 65+ वयाेगटात डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे आणि बहुतेक प्रकरणांमध्ये स्क्रीन टाइम वाढणे, समान कारण आहे.’ - डाॅ. प्रसून चॅटर्जी (प्रमुख, जेरियाट्रिक मेडिसिन, गुडगाव).
 
माेबाइलच्या व्यसनाची सुरुवात : रात्री उशिरापर्यंत फाेनला चिकटून राहणे, हे वयस्कारांमधले पहिले लक्षण आहे. आधी कमी असलेला आणि आता अति प्रमाणात विसरभाेळेपणा वाढलेला जाणवताे. बाहेरील छंद किंवा सामाजिक कार्यातील रस कमी हाेणे आणि तासन्तास फाेन पाहत राहणे, हा बदलही व्यसन दर्शवताे. फाेन बंद करण्यास सांगितल्यावर या पिढीची चिडचिड हाेते. ऑनलाइन जे वाचले किंवा पाहिले त्याबद्दलच सतत बाेलणे, तेच खरे वाटणे. मेसेज वारंवार फाॅरवर्ड करणे, आवश्यक असाे की नसाे.डाेकेदुखी, डाेळ्यांवर ताण किंवा झाेप न येण्याच्या तक्रारी, या माेबाइलच्या व्यसनाच्या सुरुवातीची लक्षणे आहेत.
Powered By Sangraha 9.0