अपंग आणि बिगर अपंग विवाह प्राेत्साहन अनुदान याेजनेत आता दीड लाख रुपये प्राेत्साहन अनुदान मिळणार आहेत. अपंग अपंग विवाहासाठीही यापुढे अनुदान मिळणार असून, त्याची रक्कम अडीच लाख रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभहस्तांतर प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून, त्यापैकी 50 ट्नके रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांसाठी मुदतठेवीत ठेवणे आवश्यक आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकराम मुंढे यांनी येथे सांगितले. वधू अथवा वर दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 ट्नके अथवा त्यापेक्षा जास्त अपंगगत्वाचे आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) धारण आवश्यक आहे. अपंग वधू किंवा वर यापैकी एक राज्याचा रहिवासी असावा.
विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फाेटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह नाेंदणी कार्यालयाकडे विवाह नाेंदवलेला असावा. विवाहानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या याेजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत असलेले सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतात. दिव्यांगत्वाकडे अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकाेन बदलणे आवश्यक असल्याचे अधाेरेखित करत, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्राेत्साहन देण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतल्याचे मुंढे यांनी सांगितले.