
ज्ञान, साधना, सुरक्षा आणि कृषीबाबत महत्त्वपूर्ण विचारांदवारे साहित्य, कला, संस्कृती आणि सभ्यता प्रगल्भ करणारा असी, मसी और कृषीचा जीवनमार्ग भगवान वृषभदेवांनी दाखवला. जगाच्या कल्याणासाठी हे विचार व ज्ञान येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पाेहाेचवणे हा उद्देश असून, देशाच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ऋषभदेवांचे विचार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बाेरिवलीत ऋषभायन-2 या तीन दिवसीय वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महाेत्सवात मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, आमदार संजय उपाध्याय, मनीषा चाैधरी, माजी खासदार गाेपाळ शेट्टी, एल. पी. सिंह, ललित गांधी तसेच जैन मुनी, शिख, बाैद्ध आणि हिंदू धर्मगुरू उपस्थित हाेते. मवृषभ कलाफ या दालन व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कलादालनाद्वारे ऋषभदेव यांनी केलेल्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा परिचय याद्वारे करून देण्यात आला आहे. ऋषभायन-2 निमित्त ङ्गऋषभयनफ या संकल्पनेतून साकार झालेल्या 1111 ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. हे सर्व ग्रंथ सखाेल संशाेधनावर आधारित असून, त्यांची संख्या 1400 पर्यंत पाेहाेचणार आहे. भगवान ऋषभ यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.