हॅपी मॅरिड लाइफचे काही नवे रूल्स

20 Dec 2025 23:10:13
 

Marriage 
 
 सर्वप्रथम पर्नया वातावरणातून आलेल्या पत्नीला नव्या वातावरणात अ‍ॅडजस्ट हाेण्यासाठी वेळ द्या. जेणेकरून ती आपल्याला व आपल्या कुटुंबाला समजू शकेल. सामंजस्य बसवू शकेल. यासाठी समजुतदारपणे वागावे.
 
 पत्नींनाही स्पेस हवी. आज बहुतेक मुली वर्किंग आहेत, त्यांची स्वत:ची विचारशैली आहे. काम करण्याची स्वत:ची पद्धत आहे, छंद, हाॅबी आहेत. त्यामुळे तिला स्पेस हवी. आज आपण पतीपरमेश्वर वा पत्नी गृहलक्ष्मी नाही. पत्नीच्या स्टाइलबाबत जास्त दखल देऊ नये. ड्रेसिग स्टाइलवर निगेटिव्ह काॅमेंट्स अजिबात करू नयेत. जर केली तर प्रेमाने व प्रशंसेसाेबत. जर ड्रेसबाबत निगेटिव्ह कमेंट केली असेल तर पर्स, सँडल वा हेअर स्टाइलची मनमाेकळी प्रशंसा करावी.
 
 पतीच्या हृदयाचा मार्ग पाेटातून जाताे असे म्हणतात. प्रत्येक पतीप्रमाणेच आपल्यालाही वाटत असेल की पत्नीने नवनवीन पक्वान्नांनी आपले स्वागत करावे. काही पदार्थ आपल्या आईसारखे बनवावेत. पण चुकूनही आपली ही इच्छा बाेलून दाखवू नका. जरी जेवणाची चव नरम असली तरी हूसन खा व फक्त हे लक्षात ठेवा की, तिने माेठ्या प्रेमाने बनवले आहे. उलट कधी कधी आपणही काही बनवून तिला खाऊ घाला. यामुळे जीवनात आनंदाचे रंग भरले जातील.
 
 पत्नीच्या गतजीवनात एखादा पुरुष मित्र वा प्रियकर असेल याच्याशी आपल्याला काय देणेघेणे. मागील अप्रिय गाेष्टी वा घटना आठवून कटुतेशिवाय काही मिळत नसते. त्यामुळे गतजीवनातील व्यक्तींची चर्चा करू नका तसेच आपल्याशी संबंधित महिलांशी तिची तुलना करू नका. कधी असे झाल्यास साॅरी म्हणायला विसरू नका.
 
 आधुनिक पत्नींसाेबत ‘मेल-फिमेल’सारख्या शब्दांपासून दूर राहा. आजच्या मॅरिड लाइफमध्ये पत्नीला स्वत:पेक्षा कमी समजू नका. तिच्या ड्रायव्हिंग वा मेकॅनिकल स्किलचाही आनंद घ्या. कधी कधी तिला ड्राइव्ह करू द्या.
Powered By Sangraha 9.0