अतिविचाराने ताण वाढताे आणि आराेग्य बिघडते

17 Dec 2025 23:31:54
 
 

stress 
 
एखाद्या क्रायसिसच्यावेळी व्यक्ती अतिविचारी हाेते, असे अनेकदा दिसते. परिस्थितीमुळे व्यक्तीचे जास्त विचार करणे साहजिक हाेऊ शकते. परंतु, दरराेजच्या रुटीन बाबतीतही काही लाेक ओव्हर थिंकिंग करत आहेत. जसे की, 63 % लाेकांनी सांगितले की, रेस्टाॅरंटमध्ये एखाद्या डिशला पसंती देणे, हे राजकीय नेत्याची निवड करण्यापेक्षाही जास्त अवघड आहे. ही आकडेवारी आणि परिस्थिती खूप गंभीर आहे.दुसरं हे की, जर सकारात्मक विचारांचे ओव्हर थिंकिंग करत असाल तर ते डे-ड्रीमिंग सारखे हाेऊन जाते. यामुळेही व्यक्ती वास्तवापासून दूर जाते. निर्णय घ्यायला अवघड हाेते. सत्य परिस्थिती कळतं नाही.मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. श्याम मिथिया यांनी सांगितले की, ओव्हर थिंकिंग करणाऱ्या व्यक्तींना क्लॅरिटी म्हणजेच स्पष्टतेचा अभाव सतत असताे.
 
विचारांमध्ये स्पष्टता असणे फारच आवश्यक असते. जेव्हा व्यक्ती ठाम, निश्चित विचार करते तेव्हा तिचे वर्तनही ठाम असते. जेव्हा विचार स्वैर असतात, तेव्हा त्या व्यक्तीचे वर्तन याेग्य असणे थाेडे अवघडच असते.चिंतांनी मेंदूवर परिणाम हाेताे ओव्हर थिंकिंगच्याही स्टेजेस असतात. जसे की, घरातील एखादी व्यक्ती तुमचा फाेन उचलत नसेलतर लाॅजिकली त्यांना वाटायला पाहिजे की फाेन चुकून सायलेन्टवर गेला असेल किंवा एखाद्या मीटिंगमध्ये असेल. पण जर तुम्ही ओव्हर थिंकिंंग करत असाल तर तुम्हाला असे विचार येऊ शकतील की कदाचित त्याचा फाेन चाेरीला गेला असेल! किंवा मग तुम्ही थेट तिथपर्यंत पाेहचाल की त्या व्यक्तीचा अपघात तर झाला नसेल? ती घरी परत येईल ना? अशा प्रकारच्या चिंतांनी मेंदूवर परिणाम हाेताेच. तसेच, शरीरावरही दुष्परिणाम हाेतात. हृदयाची धडधड वाढते.
 
अतिविचारामुळे मनाच्या तीन अवस्था जेव्हा-जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग करता, तेव्हातुमचे मन तीनपैकी एका अवस्थांमधून जाते.
त्या अवस्था म्हणजे फाईट, फ्लाईट, फ्राईट. फाईट म्हणजे परिस्थितीशी लढायचे, फ्लाईट म्हणजे परिस्थतीपासून पळणे किंवा फ्राईट म्हणजे की, परिस्थितीची भीती वाटणे. मन या तीनपैकी एका अवस्थेमध्ये येत असते.वाढताे तणाव ही परिस्थिती भरपूर तणावपूर्ण असते. म्हणून काॅर्टिझाॅल लेव्हल एकदम वाढते. मन आणि शरीर भयंकर स्ट्रेसच्यापरिस्थितीमध्ये राहते. प्राॅब्लेम हा आहे की, अशी परिस्थिती एकदा उद्भवली तर ते नुकसान शरीर सहन करते, पण जर व्यक्ती ओव्हर थिंकर असेल तेव्हा असे वारंवार हाेते.ही विचारांची सवय शरीर आणि मन, दाेन्हीला आजारी करते! ओव्हर थिंकिंग करत असल्याचे स्वीकारा बहुतांशी ओव्हर थिंकिंग नकारात्मक गाेष्टींचेच जास्त असते.
 
आधी तर स्वतःला हे पटवून द्या आणि मान्य करा की मी ओव्हर थिंकिंग करत आहे. बरेच लाेक स्वतःच्या विचारांमध्ये एवढे वाहत जातात की त्यांना स्वतः लाच काही समजत नाही.म्हणून तुम्ही जेव्हा ओव्हर थिंकिंगच्या पहिल्या लेव्हलवर पाेहाेचता किंवा तेव्हाच तिथे जागृत हाेऊन स्वतःला थांबवा. जर तुम्ही स्वतःला राेखले नाही तर, हळूहळू ती सवय हाेऊन जाईल.दीर्घकाळासाठी एन्गझायटी नावाचा मानसिक आजार हाेऊन तुमच्या समाेर उभा ठाकेल.सकारात्मक विचार वाढवा सकारात्मक ऊर्जेला स्टिम्युलेट करावे म्हणजे नकारात्मक विचारांची साखळी तुटते. सगळे चांगलेच हाेईल हा विचार जे वाईट हाेऊ शकते, या विचाराला ताेडताे. स्वतः तर्कसंगत विचारांची सवय करून घ्या. ध्यान आणि प्राणायाममार्फत वर्तमानात जगायला शिकावे! व्यस्त हाेऊन जाल तर वाईट विचार दूर पळतील!
Powered By Sangraha 9.0