चंद्रपूर महाऔष्णिक प्रकल्पात नवीन संचाला मंजुरी; आठशे मेगावाॅट वीज निर्मिती क्षमता

17 Dec 2025 23:45:36
 
 

Electricity 
 
येथील महाऔष्णिक वीज केंद्राच्या कालबाह्य झालेल्या जुन्या 210 मेगावाॅट क्षमतेच्या संच क्रमांक 3 व 4 मधून माेठे प्रदूषण हाेत आहे. त्यामुळे प्रस्तावित 800 मेगावाॅट क्षमतेचा नवीन संच अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राहणार आहे. या संचाच्या कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या संच निर्मितीवर किमान 9892 काेटींचा खर्च अपेक्षित आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्रात कालबाह्य व जुनी युनिट्स अद्याप सुरू आहेत. 3 व 4 क्रमांकाच्या या संचातून प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.
 
नवीन प्रस्तावित 800 मेगावाॅट क्षमतेचा संच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल. जुन्या व प्रदूषण वाढवणाऱ्या युनिट्समुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आराेग्यावर गंभीर परिणाम हाेत आहेत. या जुन्या युनिट्सऐवजी अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित 800 मेगावाॅट क्षमतेचे नवीन प्रकल्प टप्प्याटप्प्याने उभारले जातील. भविष्यात उभारण्यात येणारे प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील. त्यामुळे प्रदूषणात लक्षणीय घट हाेईल आणि कमी काेळशातून अधिक वीज निर्मिती शक्य हाेईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर-साकाेरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0