फुटबाॅल विश्वचषकासाठी गुणवान खेळाडू मिळतील

17 Dec 2025 23:39:28
 

CM 
 
मिशन ऑलिंपिक-2026 अंतर्गत राज्यातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि 2034 पर्यंत फुटबाॅल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून प्राेजेक्ट महादेवा राबवण्यात येत आहे.या प्राेजेक्टमधून न्नकीच गुणवान खेळाडू मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्राेजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ वानखेडे स्टेडियमवर करण्यात आला.प्राेजेक्ट महादेवा हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फाॅर ट्रान्सफाॅर्मेशन (मित्रा), व्हिलेज साेशल ट्रान्सफाॅर्मेशन फाउंडेशन, वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असाेसिएशन, सिडकाे आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या विद्यमाने राबवण्यात येत आहे.
 
जागतिक फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ आणि राॅड्रिगाे डी पाॅल, क्रीडा मंत्री माणिकराव काेकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय लाेकप्रिय फुटबाॅलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार राहुल भेके, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, अमृता देवेंद्र फडणवीस, टायगर श्राॅफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, पार्थ जिंदल, वेदना जिंदल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.लिओनेल मेस्सीने फुटबाॅल प्रेक्षकांकडे भिरकवताच प्रेक्षकांनी लिओनाेल मेस्सीच्या नावाचा जल्लाेष केला.
 
संपूर्ण मैदान मेस्सीच्या नावाने दुमदुमत हाेते. या वेळेला मेस्सीला तेंडुलकर यांच्या नावाची दहा नंबरची जर्सी तेंडुलकर यांनी भेट दिली.मेस्सीनेही तेंडुलकर यांना फुटबाॅल भेट दिला. मुख्यमंत्र्यांना मेस्सी यांनी जर्सी भेट दिली. पार्थ जिंदाल, वेदना जिंदाल यांनी जिंदाल ग्रुपतर्फे व्हिलेज साेशल ट्रान्सफाॅर्मे शन फाउंडेशनमार्फत 75 लाखांचा धनादेश प्राेजेक्ट महादेवाला दिला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे व्हिलेज साेशल ट्रान्सफाॅर्मे शन फाउंडेशनमार्फत 99 लाख 99 हजारांचा धनादेश प्राेजेक्ट महादेवाला दिला.
Powered By Sangraha 9.0