रेल्वे वॅगनवरून मालवाहू ट्रकची वाहतूक करण्यास काेकण रेल्वेची राेल-ऑन, राेल-ऑफ (राे-राे) सेवा एक किफायतशीर पर्याय आहे. परंतु त्यातून 50 टनांपेक्षा जास्त वजनाच्या मालवाहू ट्रकची वाहतूक करता येत नव्हती. आता काेकण रेल्वेने 57 टन वजनाच्या ट्रकची वाहतूक करता येईल अशा वॅगनची निर्मिती करून राे-राे सेवेची वहनक्षमता वाढवण्यात आली आहे. राे-राे वॅगनचा पहिला रेक 5 नाेव्हेंबरला धावला, तर नुकताच दुसरा वॅगन सेवेत दाखल झाला.काेकण रेल्वेवर गेल्या 26 वर्षांपासून मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगवान मार्ग तयार करणारी राे-राे सेवा सुरू आहे. ेशभरात धान्य, फळे, भाजीपाला, अत्यावश्यक सेवेतील सामग्रीची वाहतूक या सेवेद्वारे केली जाते.मालवाहू ट्रक रस्ते मार्गाने धावल्यास त्यांना वाहतूक काेंडी, इंधन खर्च व इतर अनेक खर्चाला सामाेरे जावे लागते; तसेच प्रचंड वेळखाऊ प्रवास असल्याने इच्छित ठिकाणी सामग्री वेळेत पाेहाेचत नाही.
तसेच रस्ते मार्गाने मालवाहू ट्रकचा अपघात हाेऊन अत्यावश्यक सेवा वाया जाऊ शकते. त्यामुळे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी राे-राे सेवा लाभदायक ठरते आहे. या सेवेच्या वॅगनची क्षमता 50 टन हाेती. परिणामी, 50 टनांपेक्षा अधिक वजनाचे सामान असलेल्या ट्रकची वाहतूक करता येत नव्हती.माल वाहतूकदारांसह काेकण रेल्वेचेही यामुळे नुकसान हाेत हाेते. आता या सेवेच्या वॅगनची वहनक्षमता 50 टनांवरून 57 टन करण्यात आली असून, त्यामुळे 57 टनांपर्यंत ट्रकची वाहतूक करणे शक्य झाले आहे. असे दाेन वॅगन तयार केल्याने मालवाहू ट्रक वाहतुकीला बळकटी मिळाली आहे.अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक अधिक सुलभ हाेईल. वाढलेल्या क्षमतेमुळे काेकण रेल्वेवरून लाेह आणि पाेलाद, संगमरवरी टाइल्स, बांधकाम साहित्य आणि इतर जड मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना आणि उद्याेगांना फायदा हाेईल, अशी माहिती काेकण रेल्वेने दिली