म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या निरनिराळ्या सुविधा वापरासाठीच्या 16 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 16 भूखंडांच्या ई-लिलावासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लिलावासाठी इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहे. या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने बाेली दर निश्चित केले आहेत. या दरानुसार मंडळाला 16 भूखंडांच्या ई-लिलावातून किमान 200 ते 225 काेटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. हे भूखंड शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आदींसाठी आरक्षित आहेत.
मुंबई मंडळाच्या अभिन्यासात मुंबईतील काही भूखंड सुविधा वापरासाठी राखीव असतात. या भूखंडांचा लिलाव करून त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर मंडळाच्या प्रकल्पांसाठी केला जाताे. आतापर्यंत मंडळाने अनेक भूखंड 80 ते 90 वर्षांच्या भाडेतत्त्वावर वितरित केले आहेत. मंडळाने 2024 मध्ये 15 भूखंडांचा लिलाव केला. मात्र यावेळी केवळ 5 भूखंडांची विक्री झाली आणि 10 भूखंड र्नित राहिले. त्यामुळे मंडळाने या र्नित 10 भूखंडांमध्ये नवीन 6 भूखंडांचा समावेश करून 16 भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालवणी, उन्नतनगर, चारकाेप, टागाेरनगर, कन्नमवारनगर, गाेराई, आकुर्ली, विनाेबा भावे नगर, मुलुंड या वसाहतींमधील 16 भूखंडांचा यात समावेश आहे. भूखंड लिलावासाठी इच्छुकांना 16 जानेवारीपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. 20 जानेवारीला तांत्रिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या करून भूखंडांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, 2024 मध्ये पाच भूखंडांच्या विक्रीतून मुंबई मंडळाला 200 काेटी रुपये महसूल मिळाला हाेता. मंडळाच्या बाेलीपेक्षा कित्येक पटीने अधिक बाेली लागल्याने मंडळाला चांगला महसूल मिळाला हाेता.आता या 16 भूखंडांच्या लिलावातून मंडळाला किमान 200 ते 225 काेटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.