मेकअप किंवा साज-शृंगाराविषयी बाेलले जाते तेव्हा आपल्या मनामध्ये एखाद्या पुरुषाचा विचार येऊ शकताे? सामान्यतः याचे उत्तर ‘नाही’ असेच येते. परंतु आज ही गाेष्ट अगदीच खरी मानता येणार नाही.आजचे पुरुष, विशेषतः युवकांना मर्द, मिशीदार, रफ टफ इत्यादी म्हणणे (किंवा म्हणवून घेणे) आवडत नाही.त्यांना स्वतःला साेफिस्टिकेटेड, सुंदर (हँडसम) म्हणवून घ्यायला आवडते. कदाचित या कारणामुळेच मागील काही काळापासून पुरुषांमध्येही मेकअप करण्याचे चलन जाेर पकडू लागले आहे. आणि आत्ता तर युवकांमध्ये काेरियन मेकअप, म्हणजेच ग्लास स्किनचे वेड जागृत झाले आहे. अर्थात, याचे सगळे श्रेय साेशल मीडियाकडे जातेय. जगभरातील पुरुषांना या वेडाने झपाटले आहे. मजेची गाेष्ट अशी आहे की काेरियन मेकअप करण्यात पुरुषांनी महिलांनाही मागे टाकले आहे! चीन आणि ब्रिटननंतर भारतीय पुरुष काेरियन मेकअप करण्यामध्ये आघाडीवर आहेत.
आता तुम्हाला नक्कीच वाटेल की काय आहे ही ग्लास स्किन? याच्या उत्तरादाखल साैंदर्य निष्णांत म्हणतात...काेरियन मेकअप, म्हणजेच - ब्युटीमध्ये ग्लास स्किन मिळविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते आणि काचेसारखी चकचकती, डागाशिवायची त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची विशेष काळजी/सांभाळ घेण्याबराेबरच वेगवेगळ्या उत्पादनांचा वापरही करण्यात येताे. वास्तविक, डागढब्यांव्यतिरिक्त , एकसारखा वर्ण असणाऱ्या, काचेप्रमाणे चकाकणाऱ्या त्वचेला काेरियन ग्लास स्किन म्हटले जाते.त्वचेला अद्वितीय चमक म्हणजेच तकाकी देण्यासाठी शीट मास्क, ड्यू मेकअप, डबल क्लिंझिंग, डाएट, हॅड्रेशन, सनस्क्रीन, माॅइश्चरायझर, सिरम, फेस ऑइल सारख्या वस्तूंचा वापर करण्यात येताे. तर मेकअपमध्ये लिक्विड हायलाईटर, नॅचरल ब्लश, लाईट वेट फाउंडेशन, कन्सीलर यांसारखी उत्पादने वापरली जातात.