अंडी अंड्यामध्ये प्राेटीन आणि अॅल्बुमिन असते. याच्या सेवनामुळे त्वचेचा पाेत सुधारताे. तसेच गालावरील चरबी कमी करण्यास हे घटक मदत करतात. त्यासाठी 2 अंडी, 1चमचा दूध,1 चमचा लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण चेहरा आणि मानेवर अर्ध्या तासासाठी लावावे. त्यानंतर काेमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
ग्लिसरीन ग्लिसरीन त्वचेमध्ये ओलावा निर्माण करुन त्वचा मऊ ठेवण्याचे काम करते. यामध्ये असलेले घटक त्वचेवरील अतिरिक्त फॅट्स कमी करतात. त्यासाठी 1 चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा मीठ याचे मिश्रण कापसाच्या बाेळ्याने चेहरा आणि मानेवर लावावे. 20 मिनीटांनी हा लेप धुवून टाकावा.आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा प्रयाेग केल्यास नक्कीच फरक जाणवताे.
दूध दूधामध्ये अनेक पाेषकद्रव्य असून दूधामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत हाेते.
चेहऱ्यावर दूधाचा वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी हाेतात.यासाठी 1 चमचा दूध आणि 1 चमचा मध हा पॅक अतिरिक्त चरबी असलेल्या भागावर लावून मसाज करावा. यानंतर 10 मिनीटांनी पॅक धुवावा. आठवड्यातून 2 वेळा हा प्रयाेग करावा.
हळद हळदीमध्ये अॅटी-बॅक्टेरिअल आणि अॅटीएजिंग गुण असतात. यामुळे त्वचेवरील सूज कमी करण्यास मदत हाेते.1 चमचा हळद, 1 चमचा दही आणि एक चमचा बेसन यांचे मिश्रण करुन ते लावावे.त्यानंतर 20 मिनीटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेह-यावरील चरबी कमी हाेऊन रंग उजळण्यास मदत हाेते.