मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 35362 रुग्णांना 299 काेटींची मदत

15 Dec 2025 23:06:29
 

CM 
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व सकारात्मक बदलांचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला असून, 6 डिसेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यातील 35362 रुग्णांना 299 काेटी 43 लाख 52 हजार 400 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली.या कक्षाने गेल्या वर्षभरात हजाराे गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत केली. भविष्यात अधिकाधिक रुग्णांना मदत करता यावी, यासाठी त्रिपक्षीय करार, आराेग्यविषयक सर्व शासकीय याेजनांचे एकत्रीकरण आदी उपक्रमांमधून गरजू रुग्णांसाठी मदतीचे मार्ग आणखी सुलभ हाेणार आहेत.
 
या वर्षातील सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे या कक्षाला मिळालेले एफसीआरए प्रमाणपत्र. ही परवानगी मिळवणारा महाराष्ट्रातीलमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा देशातील पहिला कक्ष ठरला आहे.यामुळे आता परदेशातून थेट देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात वर्षभरात केलेल्या सुधारणा प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पाेहाेचल्या. ऑनलाइन प्रक्रिया साेपी करणे, जिल्हा कक्षांची स्थापना आणि इतर नवीन उपक्रमांमुळे हजाराे रुग्णांना वेळेवर मदत मिळत आहे. आर्थिक अडचणीमुळे काेणाचाही उपचार थांबू नये, हा मुख्यमंत्र्यांचा संकल्प पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात उतरताे आहे.
Powered By Sangraha 9.0