चीनमध्ये जिआंगसू प्रांतात विविध रंगांच्या फुलांचा सुंदर समुद्र?

15 Dec 2025 22:51:07
 

china 
 
हे फाेटाे आहेत चीनच्या जिआंगसू प्रांतात असलेल्या कियानदुओचे.हा परिसर सध्या विविध रंगांच्या फुलांनी बहरलेला आहे. इथे पाण्याने घेरलेल्या शेतांमध्ये सुमारे 66 हे्नटर भागात शेवंती आणि झेंडुची फुले आपले साैंदर्य पसरवित आहेत. हा भाग आपल्या अनाेख्या ‘दुओतियान’ जल-शेती प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे. जिथे शेतकरी दलदल असलेल्या जमिनीवर मातीची बेटे तयार करून तिथे फुलांची शेती करतात. वरून पाहिले तर हा ‘फुलांचा समुद्र’ वाटताे.ऑ्नटाेबरच्या सुरुवातीला सुरू हाेणाऱ्या या फूल महाेत्सवात दरवर्षी हजाराे पर्यटक पाेहाेचतात. मागच्या वर्षी इथे सुमारे 24 हजार पर्यटक आले हाेते. यावर्षी 60 हजारपेक्षा जास्त पर्यटक येण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0