एमएमसी झाेनच्या 11 नक्षलवाद्यांचे पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण

01 Dec 2025 23:11:17
 
 
 

Naxal 
महाराष्ट्र- मध्य प्रदेश- छत्तीसगड (एमएमसी) झाेनमधील स्पेशल झाेनल कमिटी मेंबर विकास नागपुरे ऊर्फ नवज्याेतसह एकूण 11 नक्षलवाद्यांनी गाेंदिया जिल्हा पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केले. या 11 नक्षलवाद्यांवर शासनाचे एकूण 89 लाखांचे बक्षीस हाेते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना दरेकसा दलमच्या जहाल नक्षलवाद्यांच्या समावेश आहे.विशेष म्हणजे 11 नक्षलवाद्यांनी एकाच वेळी आत्मसमर्पण करण्याची ही गाेंदिया जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.महाराष्ट्र- मध्य प्रदेश- छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंतने 24 नाेव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली हाेती. 27 नाेव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करत 1 जानेवारीस सर्व जण शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येऊ, असे जाहीर केले हाेते.
मात्र, त्यापूर्वीच त्यांनी गाेंदिया पाेलिसांशी संपर्क साधत आत्मसमर्पणाची तयारी दर्शवली. गाेंदिया जिल्ह्यात केवळ दरेकसा दलम कार्यरत हाेता.त्याच दलमच्या नलक्षवाद्यांनी अनंतच्या ेतृत्वात आत्मसमर्पण केल्याने जिल्हा पूर्णपणे नक्षलवादमुक्त हाेण्याच्या मार्गावर असल्याचे पाेलीस उपमहानिरीक्षक अंकित गाेयल यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0