घाटकाेपरच्या हाेर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी मुंबई महापालिकेने नवे जाहिरात धाेरण जाहीर केले आहे. त्यानुसार इमारतींच्या छतांवर नव्याने काेणत्याही प्रकारचे हाेर्डिंग्ज लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. हवामान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता आदींचा परिणाम हाेर्डिंगच्या संरचनेवर हाेत असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, डिजिटल हाेर्डिंग्ज आणि सरकारी संस्थांच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसुलाबाबतही पालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.घाटकाेपर हाेर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेच्या जाहिरात धाेरणावर चर्चा सुरू झाली आहे. हे धाेरण 2008 मध्ये तयार केलेले असल्याने नवे धाेरण जाहीर कधी केले जाते आणि त्यात नेमक्या काेणत्या तरतुदी असतील, याबद्दल उत्सुकता हाेती.
नव्या जाहिरात धाेरणात हाेर्डिंगची संरचना आणि संरक्षण या संदर्भात कठाेर नियम करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारचे जाहिरात फलक, हाेर्डिंग्ज लावण्यासाठी पालिकेची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.परवानगीशिवाय लावलेल्या जाहिरातींविराेधात कठाेर कारवाईची तरतूद धाेरणात आहे.नवीन धाेरणात पहिल्यांदाच एकेरी आणि पाठपाेट फलकांसाेबतच ‘व्ही’ आणि ‘एल’ आकाराचे, तसेच त्रिकाेणी (ट्राय व्हिजन), चाैकाेनी (स्केअर व्हिजन), पंचकाेनी (पेंटागाॅन व्हिजन), षटकाेनी स्वरूपाच्या (हेक्झागाॅन व्हिजन) जाहिरात फलकांना यापुढे परवानगी देण्यात येणार आहे.