‘आयुष्मान भारत’ ची मर्यादा 10 लाख हाेणार

01 Dec 2025 23:28:11
 
 
ayu
 
केंद्र सरकार आयुष्मान भारत याेजनेंतर्गत विमा कव्हर जे सध्या 5 लाखांपर्यंत मिळत आहे, ते दुप्पट करून 10 लाख रुपयांपर्यंत करण्याचा विचार करत आहे. या याेजनेंतर्गत 4 लाख अतिरिक्त खासगी रुग्णालयातील बेड जाेडणे श्नय हाेणार असून, लाभार्थींची संख्या 55 काेटींवरून 100 काेटींपर्यंत वाढवणे श्नय हाेणार आहे. एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रीय आराेग्य मंत्रालयाच्या प्रमुख प्राधान्यांपैकी ही एक याेजना असल्याचा अंदाज आहे.ज्यांना पुढील पाच वर्षांसाठी त्यांचे साध्य लक्ष्य आणि वेळापत्रक निश्चित करण्याचे काम देण्यात आले आहे.
 
आराेग्य, आयुष, क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण आदी नऊ मंत्रालयांचा समावेश असलेल्या सामाजिक क्षेत्रावरील सरकार लवकरच कॅबिनेट सचिवांना याबाबत अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे. आयुष्मान भारत याेजना, ज्याला आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आराेग्य याेजना म्हणूनही ओळखले जाते, ही सध्याच्या सरकारची प्रमुख आराेग्य याेजना आहे. ती बहुतेकदा जगातील सर्वात माेठी याेजना म्हणून वर्णन केली जाते. ही याेजना देशाच्या लाेकसंख्येच्या 40 टक्के असलेल्या 12.34 काेटी कुटुंबांपैकी अंदाजे 55 काेटी लाभार्थींना दुय्यम आणि तृतीय आराेग्य सेवा रुग्णालयात प्रवेशासाठी प्रतिकुटुंब 5 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर प्रदान करते.
 
Powered By Sangraha 9.0