बीजभांडवल याेजनेसाठी अर्ज करण्याचे दिव्यांग व्य्नतींना शासनाचे आवाहन

29 Nov 2025 23:13:58
 

MH 
 
दिव्यांग व्य्नतींना स्वयंराेजगारासाठी प्राेत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या बीजभांडवल याेजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे. या याेजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहित नमुन्यात दाेन प्रतींत सादर करावा. अर्जासाेबत दिव्यांगत्वाचा दाखला, पासपाेर्ट साइज दाेन फाेटाे, जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपर्यंत तहसीलदारांचा), रहिवासी दाखला किंवा जागेचे प्रमाणपत्र रेशन कार्ड, दाेन प्रतिष्ठित व्य्नतींचे दाखले (नगरसेवक/ सरपंच/ग्रामसेवक/ एसईओकडून) संबंधित व्यवसायाचे खरेदी काेटेशन 1 लाख 50 हजारांपर्यंत, राष्ट्रीयीकृत बँकेचे नाव व शाखा, व्यवसायाचे प्राेजेक्ट रिपाेर्ट (सीएकडील), ज्या जागेत व्यवसाय करणार आहे त्या जागेची मुंबई महापालिका वाॅर्ड ऑफिसमधील नाेंद कागदपत्रे/संमतीपत्र/भाडे प्रमाणपत्र, शाॅप अ‍ॅक्ट लायन्सेस आदी कागदपत्रे जाेडणे आवश्यक आहे. इच्छुकांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई 71 येथे संपर्क साधावा.
 
Powered By Sangraha 9.0