नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये हाेणार आहे.यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बाेधचिन्ह स्पर्धा (लाेगाे डिझाइन) आयाेजिण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दाेन आणि एक लाख रुपयांच्या पारिताेषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवता येणार असून, देशभरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयु्नत तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डाॅ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. नाशिकमधील रामायण स्थळांची भव्यता, नाशिकचे घाट, त्र्यंबकेश्वर आणि गाेदावरीचा शाश्वत प्रवाह दाेन्ही शहरांना एकत्र जाेडताे. देशाच्या परंपरेत रुजलेली ओळख निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. नवीन बाेधचिन्हाची ओळख भूतकाळातील आवृत्त्यांच्या वारशावर आधारित असेल. भ्नती आणि एकतेची कालातीत भावना अशा स्वरूपात साकार करणारी पाहिजे.आधुनिक, संदर्भात्मक आणि जगभरातील विविध प्रेक्षकांसाठी आकर्षक असे बाेधचिन्ह असावे. यामुळे सहभागींना प्रेरणा मिळू शकेल. अधिक माहितीसाठी www.mygov.in किंवा ntkmalogocompetitiongmail.comया ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.